Press "Enter" to skip to content

तिरंगी झेंडे की………जय

तिरंगी झेंडे की………जय

        आज आपण पाहातो की आपल्याला मन मानेल तसे वागता येते.जसं मनात येईल तसं बोलता येते.मत प्रदर्शित करता येते.लिहिताही येते.ही सर्व देण कोणाची?तर ती त्या शहिदांची तसेच आपल्या तिरंगी झेंड्याची.तिरंगी झेंडा हा आपला राष्ट्रध्वज आहे.त्याचा अपमान हा आपण आपला अपमान समजतो.नव्हे तर त्याचा अपमान करणा-या लोकांचा आपल्याला राग येतो.

       ध्वजाच्या बाबतीत विचार केला तर तो कोणताही ध्वज का असेना,त्या ध्वजाला विजयाचं प्रतिक मानलं आहे.त्या ध्वजाचे रक्षणार्थ व साम्राज्यविस्तार योजनेतून पुर्वीचे राजे लढत.जेव्हा भारत पारतंत्र्यात गेला.तेव्हा त्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावर इंग्रजांनी आपला राष्ट्रध्वज युनियन जँक लहरविला होता.त्या झेंड्यावर पुढे पंधरा आँगष्ट १९४७ ला पुन्हा तिरंगा ध्वज चढवून कित्येक भारतीय आत्म्यांनी स्वातंत्र्याचा जयघोष केला होता.

          पुर्वीपासून भारत हा भारत नव्हता.तर तो हिंदुस्थान होता.येथील राज्य छोट्या छोट्या तुकड्यात विखूरले होते.अनेक संस्थाने होती.त्या संस्थानिकांजवळ ताकद होती.पण अत्याधुनिक हत्यारे नव्हती.तसेच माणसं होती,पण आपली माणसं नव्हती.अनेक माणसं फितूरीच्या व स्वार्थाच्या पलिकड जावून एकमेकांचा जीव घेण्यात धन्यता मानत होती.

       मुळात छोट्या छोट्या राज्यामध्ये असलेला हिंदुस्थान पुढे या देशाच्या दिल्ली तख्त्याने अनेक राजे पाहिले.अलाउद्दीन खिलजी,कुतूबशहा,मोहम्मद तुघलक,बाबर,हुमायून,शहाजहान,अकबर पासून तर ते बहाद्दरशहा जफर पर्यंत.इथे पुर्वीच्या पुरु समुद्रगुप्तच्या काळापासूनच विदेशी लोकं व्यापार करायला येत.सोने,चांदी तसेच विपुल धनसंपत्ती भारताच्या या भागात जास्त असल्याने भारताला एकेकाळी सोने की चिडीया म्हणत.त्यातच संपुर्ण जग जिंकण्याची इच्छा बाळगून असलेल्या सिकंदराने भारतावर जेव्हा आक्रमण केले,तेव्हा साहजिकच त्याचा सेनापती सेल्युकस निकेटरला या भारताचा प्रत्यय आला.सिकंदर माघारी फिरला,पण सेल्युकस………सेल्युकस मात्र माघारी गेला नाही.त्याने याच भारतातील एका तरुणाशी आपल्या मुलीचा विवाह लावून दिला.केवळ भारतातील विपुलता पाहून.तसेच येथील सोन्याची खाण पाहून.पुढे याच भारताला लुटण्यासाठी अनेक रोमन राजे,ग्रीक राजे आले मुस्लिम लुटेरे आले.त्यात मोहम्मद गझनी एक.मोहम्मद गझनी ने सतरा वेळा स्वा-या करुन भारतातील सोने आपल्या देशात नेले,पण या भारतातील सोने कमी झाले नाही.समुद्रगुप्ताच्या काळाला याच भारताला सुवर्णयुग मानलं गेलं एवढा हा हिन्दुस्तान सुसंपन्न होता.होवून गेलेल्या या हिंदुस्थानातील राज्यामध्ये काही चांगले राजे होवून गेले.पांचाळ,चोल हे घराणे त्यापैकीच.त्यांनी स्थापत्य कलेवर जास्त जोर दिला.काही राज्ये प्रजेच्या हितासाठी काम करीत.त्यांच्या हिताचे निर्णय घेत.तर काही राज्ये अन्यायी वृत्तीचेही झाले.त्यांनी कधीच प्रजेचे हित पाहिले नाही.म्हणूनच मगधचा राजा धनानंदाच्या काळात आर्य चाणक्यांना शेंडीस गाठ बांधावी लागली.नव्हे तर चंद्रगुप्तास प्रशिक्षित करुन धनानंदाचा नाश करावा लागला.

        महाराष्ट्र राज्य स्थापन करीत असतांना शिवरायांना सहजासहजी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही.प्रथम येथील आपल्याच माणसांशी लढावे लागले.येथील देशमुख, देशपांडेंना वठणीवर आणावे लागले.त्यानंतर त्यांना आदिलशहा,निजामशहा,मोगल बादशहा व इंग्रजांशी लढावे लागले.महत्वाचं म्हणजे लहानशा स्वार्थासाठी सत्ताधारी वतनदार,जमीनदार नव्हे तर राजे रजवाडे आपल्याच वतनाशी व देशाशी भांडत.

        भारताची किर्ती जेव्हा इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगाल,डच यांनी ऐकली,तेव्हा या देशात १४५३ मध्ये पहिला पोर्तुगीज प्रवाशी आला.त्याचे नाव वास्को-दी-गामा होते.तो कास्टँटिनोपल मार्गे भारतात आला होता.त्याच्या आल्यानंतर मात्र पोर्तूगीजांना हा भाग एवढा आवडला की त्यांनी आताच्या गोव्याला आपली राजधानी बनवत तिथे ते स्थिरावले.त्यांनी याच देशात येवून या भारतातील जुन्या हिंदूंला ख्रिश्चन बनवले.काहींना स्वखुशीने तर काहींना बळजबरीने.या ख्रिश्चन बनविण्याच्या प्रक्रियेत ते हिंदूंना बंदी बनवून त्याचे हात पाठीमागे बांधत व त्या माणसांनाही एका खांबाला बांधत.काहींना मारत तर काहींचे खांबाला बांधून हात कापत.जो ख्रिश्चन बनण्यात तयार होत असे.त्याला मात्र या खांबावरुन सोडून देत.आजही गोव्यातील हातकातरी खांब याची साक्ष देत आहे.

        साहजिकच या देशात आलेले इंग्रज,पोर्तुगीज,डच आणि फ्रेंच यांनी या देशातील लोकांचा विचार केला नाही.मुस्लिमांनीही या देशाचा विचार केला नाही.इथला सोना तर लुटलाच.पण या देशातील सामान्य लोकांवर अत्याचार करुन आपला धर्म वाढवला.हे विदेशी घरात घुसून आमच्या मायबहिणींची अब्रुही लुटत.त्यापूर्वी येथील राजेही तेच करीत.त्यांना एखादी सामान्यांची मुलगी आवडली की ती कितीही वयाची का असेना.तिच्यावर बलत्कार करीत व ती जर गरोदर राहिली तर तिची रवानगी जनानखाण्यात करीत.जनानखाने म्हणजे त्यावेळचे वेश्यालयच होते.इथे जन्मलेले बाळ जर नर असेल,तर त्यांचा वापर सैनिक म्हणून आणि स्री असेल तर तिचा वापर दासी म्हणून केला जाई.पण इथे आलेल्या विदेशी मंडळींनी मात्र बलत्कार केले,पण कोणत्याच स्रीयांचा पत्नी म्हणून स्विकार केलेला नाही.

        स्वार्थासाठी अंध झालेले येथील वतनदार थोड्याफार स्वार्थासाठी पुर्वी  मुस्लिमांना फितूर झाले.याच फितूरी पणातून राजे संभाजीची हत्या झाली.नव्हे तर रजपूत राजा मानसिंह मोगलांशी फितूर होवून हल्दीघाटची लढाई झाली.त्याने तर बादशहा अकबराला आपली बहिण जोधा दिली.आजही जोधा अकबर इतिहासात प्रसिद्ध आहे.त्यानंतर सत्तेसाठी सत्तांध रघुनाथराव,बंगालमध्ये मिरजाफर इंग्रजांना फितूर झाले व त्यांनी या देशातील सामान्यांची आपल्याबरोबरच हत्या केली.जोपर्यंत काम होते,तोपर्यंत इंग्रजांनी या लोकांचा वापर केला व काम संपताच त्यांची हत्या केली.

         मोगल सम्राट दिल्लीत असतांना थामस रे आणि त्याचा सहकारी जेव्हा व्यापारी सवलती मागण्यासाठी बादशहाकडे पंधराव्या शतकात आला.तेव्हा व्यापारी सवलत मिळताच तो या देशात स्थिरावला.त्यांना या देशात पाय रोवल्यानंतर येथील राजनीती थोड्या प्रमाणात समजली.इथे पिकणारा लांब धाग्याचा कापूस त्यांना आवडला.तसेच इथे पिकणारे चहाचे मळे ही त्यांना आवडले.इथून चहा,कापूस निर्यात करुन घेण्यापेक्षा येथील मालक बनणे या इंग्रजांनी पसंत केले.त्यातच वेगवेगळी धोरणं आणून हळूहळू येथील संस्थानिकांना त्यांनी नामधारी बनवलं.येथील प्रजेसह राजांनाही असलेली अफूची सवय,या सवयी वाढवल्या,नव्हे तर त्यांच्या वाट्यातील राडा असलेल्या फ्रेंचांशी लढाई करुन त्यांना हारवलं.पुढे फ्रेंच येथील सक्रीय राजकारणात दिसले नाहीत.ते मायदेशी निघून गेले.

          इंग्रजांनी या देशात पाय तर रोवले.पण हे जेव्हा भारतायांच्या लक्षात आले,तेव्हा वेळ बरीच निघून गेली होती.तरीही त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.तात्या टोपे,नानासाहेब पेशवे,राणी लक्ष्मीबाई,टिपू सुलतान,सिराजउदौला या सर्वांनी १८५७ चा उठाव केला.कारण होतं हिंदू मुस्लिमांच्या भावनेला छेद.इंग्रजांकडे नोकरी करणारे सैनिक मुस्लिमांना डुकराचे मांस लावून काडतूस दिलं जायचं.तर हिंदूंना गाईचं मास लावून.ही बंधूक वापरण्यापुर्वी त्याचं काडतूस दातांनी काढावं लागायचं.त्यामुळे सैनिक भडकले व उठाव झाला.हाच उठाव १८५७ चा उठाव म्हणून प्रसिद्ध आहे.हा उठाव इंग्रजांनी दडपला.कारण उठाव करणा-या राज्यकर्त्यांजवळ अत्याधुनिक शस्रास्त्रे नव्हती.प्रशिक्षित सैनिक नव्हते नव्हे तर हा उठाव तुकड्यातुकड्याने झाला होता.त्यामुळे हा उठाव अयशस्वी झाला.पराभव होताच काही नेते मारले गेले.काहींना इंग्रजांनी कैदेत टाकले.काही मात्र वेषांतर करुन पळून गेले.राणी लक्ष्मीबाई,नानासाहेब पेशवे व तात्या टोपे हे मात्र कोणालाही दिसले नाहीत.पुर्ण स्वराज्य प्राप्त करणे हे ध्येय असले तरी या उठावात पुर्ण स्वराज्य प्राप्त करता आलं नाही.१८५७ नंतर इंग्रजांचा या देशावर एकछत्री अंमल सुरु झाला.

       पुढे लाचारीचं जीवन भारतीयांच्या वाट्याला आलं.बैलाला पराणी टोचणेही महागात पडायला लागले.बैलाला पराणी टोचू नये म्हणून हे इंग्रज माणसांना पराणी टोचत.स्वतः मात्र मुक्या शिकार करुन हत्या करीत.मात्र या इंग्रजांनी आपला धर्म पोर्तुगीजांसारखा या देशावर लादला नाही.इंग्रजांनी या देशावर अत्याचार केले हे जरी खरं असलं तरी या देशाला अंधश्रद्धेच्या बुरख्यातूनही बाहेर काढले हे विसरता कामा नये.त्यांच्या देशात अाजही अलिखीत राज्यघटना आहे.राजांला दैवी पुरुष मानलं जातं.पण देव आपल्याला विणा प्रयत्नांनी देत नाहीत हे त्यांनी जगाच्या मनात शिरवलं.त्यांनी जगावर राज्य केलं.त्यांच्या साम्राज्यात सुर्य कधीच मावळत नव्हता.एवढा त्यांचा विस्तार होता.१८५७ नंतर इंग्रजांनी या देशात सुधारणावादी दृष्टीकोन ठेवला.या सुधारणावादी दृष्टीकोनातून बरीच भारतीय मंडळी शिकली.या भारतीय मंडळींनी येथील पराभवाचा अभ्यास केला.जुन्या काळापासून चालत आलेल्या रुढी परंपरा किती घातक आहेत.देशात काय वाईट काय चांगले याचा अभ्यास केला.सतीप्रथा अत्यंत वाईट प्रथा.ही प्रथा राजा राम मोहन राय यांनी इंग्रज अधिकारी लार्ड विल्यम बेंटीकच्या माध्यमातून बंद केली तर विधवा पुनर्विवाहासाठी महादेव गोविंद रानडे लढले.

          देशातील विधवेपण,बालविवाह,केशवेपण,सतीप्रथा,जातीप्रथा ह्या प्रथा किती वाईट आहेत.त्या इंग्रज आहेत तेव्हापर्यंत बंद व्हायला हव्यात असे काही भारतीयांना वाटत होते.तर इंग्रज देश सोडून गेल्यावर सुधारणा हव्या त्या करता येईल हे काही भारतीयांना वाटत होते.त्यातच देशातील विचारवंतांचे दोन गट पडले.एक जहाल गट व दुसरा मवाळ गट.जहाल अर्थातच सुधारणा नको म्हणणारा पण क्रांतीकारी.मवाळ अर्थात सुधारणा व्हायला पाहिजे असे म्हणणारा.काही नेते बोलत होते.कधी त्यांच्या वाणीतून वायफळही निघायचं.पण ते देशासाठी होतं.या भारताला स्वतंत्र्य करण्याच्या मार्गात.काही कृती या नेत्यांच्या आज पटल्यासारख्या तमाम लोकांना वाटत नाहीत.पण त्यावरुन त्यांची महकता कमी होत नाही.असहकार आंदोलनातून तसेच चलेजाव आंदोलनातून देशवासीयांना जागृत करुन ज्या महात्मा गांधींनी देशातील सामान्य लोकांना जागृत केले.नव्हे तर एका झेंड्याखाली आणले.टोळ्या टोळ्यात किंवा तुकड्या तुकड्यात विखूरलेल्या या देशातील तमाम राज्यकर्त्यांना एकत्र आणून तसेच विखुरणा-या प्रजेची मानसिकता लक्षात घेवून त्या लोकांना एकत्र करणे साधी गोष्ट नव्हती.ती दुर्मीळ गोष्ट महात्मा गांधींनी साध्य केली.ज्या लहानशा घरात आम्ही दोन भावंडं विचारानं एक येवू शकत नाही.त्या देशात महात्मा गांधींनी देश एकत्र आणला.ही प्रसंशनीय गोष्ट आहे.तरीपण त्यांच्या पाकिस्तान निर्मीतीच्या व त्यांना पंच्चावन कोटी रुपये देण्याच्या निर्णयावरच्या एका चुकीने आम्ही त्यांना धारेवर धरतो.तसेच ज्या देशासाठी अमाप पैसा पदराशी असूनही पंडीत नेहरुंनी सर्वस्व वाहिलं.त्यांही नेहरुंवर काश्मीरप्रश्नी टिकास्र ओढतो.देशासाठी प्रयत्न करणा-या लोकमान्य टिळकांनाही आम्ही त्यांच्या एका वाक्याने दोषच देतो.चुका प्रत्येक माणसांकडूनच होतात.जो काम करतो.काम न करणा-या माणसांकडून चुका होत नाहीत. मोदी साहेबांकडूनही नोटबंदीची चूक झाली.पण याचा अर्थ असा नाही की त्या चुकीमुळे तो माणूस खराब आहे.

          आज देशाला ख-या अर्थानं महत्मा गांधी,लेकमान्य टिळक,पंडीत नेहरु,लाला लजपतराय,भगतसिंग,चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांची गरज आहे.त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करण्याची गरज आहे.संबंध देशांना रणाविण स्वातंत्र्य मिळवून देणारा महात्मा…….शस्रानं तर कोणीही स्वातंत्र्य मिळवेल.पण भारत हे स्वातंत्र्य मिळवू शकला नसता.कारण भारताजवळ लोकसंख्याबळ जरी असलं तरी त्या इंग्रजांच्या अत्याधुनिक शस्राच्या तुलनेत हे भारतवासी त्यांच्यापुढे टिकू शकले नसते.हे तेवढेच खरे आहे.

         आज देशाला त्यांच्या विचाराची गरज आहे.पण आम्ही त्यांच्या विचाराची हत्या करीत आहोत.त्यांची तर हत्या आम्ही केली.आता विचार!खरंच याचा विचार आपल्याला करण्याची गरज आहे.यासाठी कुठेतरी मागे वळून पाहण्याची गरज आहे.

        ज्या देशात इंग्रजांचे राज्य होते,त्या देशात ध्वजाला लहरविण्यासाठी तसेच तो धरुन फिरण्यासाठी बंदी होती.त्या देशात आपला भारतीय माणूस ध्वज हातात घेवून तिरंगी झेंडे की जय म्हणत.तसेच भारतमाता की जय म्हणत मिरवणुक काढायचे.इंग्रजांना राग यायचा.ते मारायचे.त्यात त्यांचा जीव जायचा.ते प्राण सोडायचे,पण ध्वज खाली पडू देत नसत.एवढं ध्वजाचं महत्व होतं.आज ज्या काश्मीरच्या जनतेनंही स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेतला होता.त्याच काश्मीरात तिरंगा जाळला जातो आहे.आज भारत स्वतंत्र्य होवूनही तिथल्या लोकांना स्वतंत्र्य झाल्यासारखे वाटत नाही.सतत डोळ्यासमोर बंदुकीच्या गोळ्यांचा थरार दिसतो.अगदी वैतागल्यासारखं वाटत.इच्छा नसूनही इथे तिरंगे जाळले जात होते.हे कुठेतरी बंद होणे गरजेचे होते.म्हणून मोदी व अमीत शहांनी काश्मीरी जनतेसाठी जे काही केलं ते प्रशंशनीय आहे.नेहरुंची झालेली चूक दुरुस्त झाली.आता मात्र महात्मा गांधीची चूक दुरुस्त करणे बाकी आहे.

         पाकिस्तान काश्मीर धक्क्याने धास्तावला जरी असला तरी तो घाबरलेला नाही.तो भारताबद्दल कुरघोडी करीत सुटला आहे.तो जर असा आपला हट्टीपणा सोडत नसेल तर एक दिवस आपल्याला भारतीय या नात्याने पाकिस्तानला घशात घालावे लागेल तेव्हाच साहजिकच महात्मा गांधींनी केलेली चूकही दुरुस्त होईल.भारत माझा देश आहे.हे तमाम काश्मीरवाल्यांनाही वाटते.ज्या तिरंग्याने स्वातंत्र्य स्थापन करतांना शहीदात बळ आणलं होतं.त्या तिरंग्याने काश्मीरातही क्रांती केली.जेव्हा तिथे तिरंगा जाळण्यात आला,तेव्हा याच तिरंग्याने जळतांना तिथल्या जनमाणसांना प्रोत्साहित केले.नव्हे तर त्यांच्या मनात देशाप्रती प्रेम निर्माण केले.आज तिरंग्याचा जय झाला आहे.यावर्षी पहिल्यांदा काश्मीरात थाटानं तिरंगा लहरविला जाईल.त्यावेळी काश्मीरी जनतेत किती उत्साह असणार याची कल्पना न केलेली बरी.काश्मीर सोबतच इतर राज्यही या दिवशी सन्मानानं तिरंगी झेंडे की जय म्हणतील.

            ज्या तिरंग्याने लढण्यासाठी बळ आणलं.त्या तिरंग्यासाठी एक मात्र लक्षात ठेवा की त्या तिरंग्याचा अपमान कोणी करु नका.एवढ्या वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर आपल्याला ज्या तिरंग्याने शहिदांच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं,त्या तिरंग्याला रस्त्यावर फेकू नका.जाळू नका.फाडू नका.कच-याच्या डब्यात टाकू नका.नव्हे तर उलटा करु नका.तो तिरंग्याचाच नाही तर जनमाणसाच आणि देशाचा अपमान आहे हे लक्षात घ्या.त्याचबरोबर देशातील तमाम भाऊबहिणींना आपले बांधव माना.भारताची प्रतिज्ञा मनामनात गिरवा व ती आपल्या अंतरंगात उतरु द्या.ज्या देशातील आपल्या आई बहिणींची इज्जत विदेशांनी लुटली,तसेच आपल्याच देशातील राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यापुर्वी लुटली.तो देश आज स्वतंत्र्य झालाय हे लक्षात असू द्या.आपल्या आपापसातल्या भांडणातून आपण गुलाम झालो.त्यामुळे तसे भांडण होवू देवू नका.नाहीतर याच भांडणाचा फायदा घेवून याच भांडणातून पुढे पुन्हा एखादा विदेशी फायदा घेईल व आपल्याला गुलाम करुन जाईल आणि पुन्हा एकदा आपल्याला आपल्या देशासाठी तिरंगा हातात घेवून लढावे लागेल.अशी वेळ येवू नये म्हणून आजपासून सतत गिरवत रहा आणि बोलत राहा.तिरंगी झेंडे की जय.खरंच तिरंगा उत्साह,प्रेरणा, ताकद,साहस, शौकत सर्वकाही देतो हे लक्षात असू द्या.

            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.