Press "Enter" to skip to content

राष्ट्रध्वज आपला अभिमान…राखा त्याचा मान……   

राष्ट्रध्वज आपला अभिमान…राखा त्याचा मान……   

               स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे दोन आपले राष्ट्रीय सण आहेत. या दोन्ही दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनावर कोरोनाचे सावट असले तरी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह मात्र कमी होणार नाही हे निश्चित आहे.  स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी यांचे आपण स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. त्याचबरोबर यादिवशी आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा देखील सन्मान करतो. अनेकजण आपल्या घरावर किंवा वाहनाला राष्ट्राध्वज लावतात आणि मिरवतात. या दिवशी मोठ्या प्रमाणावर कागदी आणि प्लास्टिकचे ध्वज खरेदी केले जातात. पण स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी  १६ ऑगस्टला मात्र  रस्त्यांवर, कचराकुंडीत किंवा इतरत्र हे ध्वज पडलेले दिसतात. नकळतपणे लोकांचे पायही या ध्वजांवर पडतात. राष्ट्रध्वज हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. तो जर कचराकुंडीत किंवा रस्त्यावर फेकला गेला तर त्याचा अपमान होतो. राष्ट्रध्वजाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान म्हणून राष्ट्रध्वजाचा मान राखून त्याचा अपमान होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी. सध्या बाजारात राष्ट्रीय ध्वज तिरंगा मास्क विक्रीसाठी आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाच्या रंगातील हे मास्क विक्रीसाठी सर्वत्र दिसत आहेत.  तिरंगा रंगाच्या या मास्कवरही  सरकारने बंदी घातली पाहिजे. नागरिकांनीही तिरंगा रंगाचे मास्क वापरू नयेत. तिरंगा मास्क वापरल्यास घाम,  थुंकी लागून राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ शकतो. स्वातंत्र्य दिनाच्या  दिवशी कोणीही प्लास्टिकचे किंवा कागदाचे ध्वज विकत घेऊ नयेत, सरकारनेही अशा ध्वजांवर बंदी आणावी, विक्रेत्यांनी देखील असे ध्वज विकू नयेत. तसेच तिरंगा रंगाच्या मास्कवर देखील नागरिकांनी बहिष्कार घालावा सरकारने  तिरंगा मास्क विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी.  नागरिकांनी राष्ट्रध्वज रस्त्यावर किंवा इतरत्र पडलेले आढळल्यास तो सन्मानाने उचलून, स्वच्छ पुसून, जतन करुन ठेवावा. राष्ट्रध्वजाचा मान राखणे ही प्रत्येकाची जाबाबदारीच  नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे.

श्याम बसप्पा ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

९९२२५४६२९५

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.