Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज २२ पॉजेटीव्ह तर एकाचा मृत्यू


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) ###


उरणमध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉजेटीव्हचा आकडा वाढू लागला आहे. आज दिवसभरात उरणमध्ये २२ कोरोना पॉजेटीव्ह आढळले आहेत. तर बोकडविरा येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मयताचा आकडा ९ वर गेला आहे.
उरणमध्ये उरण ४, बोकडविरा ५, चिरले२, विंधणे २, दिघोडे १, जासई १, जसखार १, जेएनपीटी १, करंजा १, म्हातवली १, मुळेखंड १, नागाव १, केगावं १ असे एकूण २२ जण पॉजेटीव्ह आढळले आहेत. तर बोकडविरा येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज एकूण पॉजेटीव्हचा आकडा ३९०, वर गेला आहे. त्यामध्ये पूर्ण बरे झालेले २४७ आहेत, उपचार घेणारे १३४, मयत ९ अशी आकडेवारी असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
उरणमध्ये पॉजेटीव्हचा आकडा वाढू लागल्याने उरणकरांसाठी चिंताजनक आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. मयतांचा आकडाही आता दररोज एक मयत होऊन वाढू लागला आहे. एकूण मयतांचा आकडा ९ वर गेला आहे. त्यामुळे उरणच्या जनतेने जागृत रहावून योग्य ती सुरक्षिततेची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.