Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा हद्दीतील एकूण 77 कोरोनाबाधित

22 जणांची कोरोनावर मात तर आज नव्याने 15 जणांना लागण ###

सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे ###

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे. यातच परीसरातील इतर भागापेक्षा कोरोनाचे रुग्ण वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत वाढतच असल्याने चिंतेची बाब आहे.दरम्यान आज दुपारपर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीतील आली आंबिवली एक पुरुष,मोहोपाडा दोन पुरुष, नविन पोसरी दोन पुरुष,चांभार्ली वृंदावन एक पुरुष, दुर्गामाता काॅलनी रिस एक पुरुष,अपुर्वा वसाहत रिस एक,पंचरत्न रिस पाच एकाच कुटुंबातील,व(दोन महिला-दोन पुरुष आणि लहान मुलगा),तलेगाव एक पुरुष असे शनिवारी दुपारपर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीत पंधरा कोरोनाबाधित सापडले असून बुधवारी एकूण 77 झाले आहेत तर 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे.रसायनी परीसरातील मोहोपाडा बाजारपेठेत आसपासच्या परिसरातील नागरिक खरेदीसाठी येत असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होवून सोशल डिस्टसिंगचे तीनतेरा वाजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनासंसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.