दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : खासदार सुनील तटकरे
सिटी बेल ∆ बोर्ली पंचतन ∆ केतन माळवदे ∆
मानवी आयुष्य अतिशय सुंदर आहे . दिव्यांगत्वाने आयुष्य संपत नाही. व्यक्तीमधील आत्मबल जिद्दीन आयुष्य जगण्यासाठी असंख्य संकटाचा सामना करून व्यक्तीला सर्व क्षेत्रात भरारी घेण्यासाठी सक्षम बनवत असते. माझ्या मतदारसंघातील सर्व दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.
श्रीवर्धन नगरपरिषद शाळा क्रमांक १ मध्ये दिव्यांग तपासणी शिबिराचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले . १६ डिसेंबर २०२३ ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटन प्रसंगी सुनील तटकरे म्हणाले, मतदारसंघातील दिव्यांग बांधवांच्या समस्या लक्षात घेऊन सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलीम्को ) यांच्या माध्यमातून दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे यांची उपलब्धता आपण करत आहोत . दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण,पुनर्वसन, रोजगार, त्यांच्यातील सुप्त कलांना वाव देण्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी समान संधी केंद्र आणि राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे दायित्व खासदार या नात्याने माझे आहे . अलीम्को संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व इतर साहित्य देण्यासाठी, मोजमाप घेण्यात येणार आहे वैद्यकीय अधिकाऱ्या मार्फत तपासणी करून गरजेप्रमाणे कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कुबड्या,तीन चाकी सायकल, सीपी चेअर, व्हील चेअर,डिजिटल स्टिक, डिजिटल श्रवण यंत्र व मतिमंद मुलांसाठी शैक्षणिक किट आपण दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून देत आहोत. माझ्या सर्व दिव्यांग बांधवांचे आयुष्य सुखकर व आनंददायी करणे हे माझं नैतिक कर्तव्य आहे असे सुनील तटकरे यांनी सांगितले .

सदरच्या दिव्यांग शिबिर प्रसंगी दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार, अलीम्को या संस्थेचे डॉ.निहांश मेहता, विशेष कार्यकारी अधिकारी अमित शेडगे , जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ.शामराव कदम , मुख्याधिकारी विराज लबडे , तहसीलदार महेंद्र वाकलेकर , गटविकास अधिकारी गजानन लेंडी, एकता दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष निलेश नाक्ती, सहकार्य दिव्यांग पुनर्वसन संस्था म्हसळा अध्यक्ष विजय लाड व तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीवर्धन नगरपरिषद , पंचायत समिती श्रीवर्धन व तहसील कार्यालय श्रीवर्धन यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी , तसेच संजय गांधी दिव्यांग योजना व नगरपरिषद दिव्यांग निधीची वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सापते यांनी केले.










Be First to Comment