Press "Enter" to skip to content

बँकेच्या शाखेच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन

माथेरानकरांना एक टक्का जादा व्याज देणार व कर्जदारांना कमी व्याज आकारणार — जयंत पाटील

सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆

‘माथेरान हे गाव तीन हजार मतांचे आणि पुढारी 400 आहेत.माथेरान नागरी पतसंस्था सावंत, चौधरी यांनी ती व्यवस्थित चालवून दाखवली आहे. या ठिकाणी मी तुमचा देणेकरी म्हणून आलो आहेआगामी काळात माथेरानच्या विकासामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा महत्वाचा आणि सिंहाचा वाटा असेल. माथेरानमधील बँकेच्या खातेदारांना एक टक्का अधिक व्याज दिले जाईल व कर्जदार खातेदारांना कमी व्याज आकारले जाईल.’ अशी महत्वपूर्ण घोषणा बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

कर्जत तालुक्यातील माथेरान येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माथेरान विस्तारित कक्षाचे कोनशिला अनावरण आणि बँकेच्या शाखेच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन आमदार जयंत पाटील यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी यावेळी बँकेचे उप अध्यक्ष सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी मते, संतोष पाटील, अण्णा दिवेकर, शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट, खालापूर येथील अध्यक्ष संतोष जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, नेरळ शहर चिटणीस शफीक शेख, माथेरानचे माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, मनोज खेडकर, अजय सावंत, बबिता शेळके, आकाश चौधरी, प्रसाद सावंत आदी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, ‘माथेरानमध्ये शनिवार, रविवार व्यवसाय असतो. त्यामुळे रविवारी देखील बँकेचा व्यवसाय सुरू ठेवता येईल का? हे पाहिले पाहिजे. मात्र एटीएम सेवा सुरूच राहील पण सर्व पॉइंटवर बँकेची मदत पोहचली पाहिजे. यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी बँकेचे पथक माथेरानमध्ये येवून सर्वेक्षण करील. माथेरानचा विकास साधण्यासाठी माथेरान हाच पक्ष करा. माथेरानमध्ये बँकेचा व्यवसाय तीनपट होऊ शकतो. माथेरानचा विकास करायचा असेल तर व्हा आणि पक्षाचे नाव न घेता बंगलेवाले, पर्यावरण प्रेमी यांना एकत्र करा. झोपडपट्टीधारकांनाही न्याय देण्यासाठी काम करा. पक्ष बाजूला ठेवून व्यवसायिक दृष्टिकोनातून विकास साधायचा असतो. झोपडपट्टी पुनर्वसन योजना अमलात आणण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यायला हवे. ही योजना राबविण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य देऊ.

यावेळी 62 वी शाखा सुरू होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान करणारे शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे,जागा मालक प्रतिक ठक्कर,अश्वपाल संघटना अध्यक्ष आशा कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या वेळी माथेरान नागरी पतसंस्थेने जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा सत्कार करताना पतसंस्थेची 10 लाखाची ठेव बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा धनादेश देखील वर्तक यांना सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप जगे यांनी केले.

याप्रसंगी माथेरान व्यापारी फेडरेशन अध्यक्ष राजेश चौधरी, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, माथेरानचे सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, रमाकांत तोरणे, सहचिटणीस उमेश कदम, राजेंद्र हजारे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी अध्यक्ष गजानन पेमारे, विद्यमान उपाध्यक्ष कृष्णा बदे, तसेच शेकाप तालुका उपाध्यक्ष रवींद्र भोईर, नेरळ सोसायटी अध्यक्ष राजेंद्र विरले, उपाध्यक्ष रवींद्र झांजे, शेकाप तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेश म्हसे, अलिबाग अर्बन बँकेचे संचालक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.