Press "Enter" to skip to content

रायगडच्या पाच खेळाडूंची आंतरराष्ट्रीय तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी निवड

सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतीनिधी ∆

दिनांक १८ ते २२ ऑगस्ट २०२३ रोजी तायक्वॉड वॉ मुजु (दक्षिण कोरिया) येथे होणाऱ्या १६ जागतिक तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी व प्रशिक्षणासाठी रायगड व नवी मुंबईतील पाच खेळाडूंची निवड झाली आहे.

यामध्ये १) मेघा जनार्दन पाटील (एम.जी.एम कॉलेज), २) अक्षता अंकुश भगत (ए.एस. सी. कॉलेज पनवेल), ३) मयुरेश राम घरत (एम.एन.आर. पळस्पे ), ४) नंदिनी श्रीकांत गुजाले ( वाशी इंग्लिश हायस्कूल टिळक), ५) रूद्रा संजय जाधव ( क्रीस्ट चर्च स्कूल भायखला) यांचा समावेश आहे.

या स्पर्धेसाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून सुभाष पाटील आंतरराष्ट्रीय पंच व ७ डान ब्लॅक बेल्ट आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अनिल म्हात्रे ३ डान ब्लॅक बेल्ट यांची निवड झाली आहे. या स्पर्धा व प्रशिक्षणासाठी वरील सर्व खेळाडूंना तायक्वॉन्डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रायगड तायक्वॉन्डो असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांनी हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.