प्रभुदास भोईर यांच्या सहकार्याने जाकीर खान यांनी केले इफ्तार पार्टीचे आयोजन : सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती
सिटी बेल ∆ कळंबोली ∆
महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या सहकार्याने कळंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते जाकिर खान यांनी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या इफ्तार पार्टीला समाज बांधवांसह सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.
जाकीर खान हे फक्त निवडणूक आली की इफ्तार पार्टीचे आयोजन करीत नसतात तर सातत्याने गेली २१ वर्षे ते हा कार्यक्रम करीत आहेत. येथील समाजासाठी ते कायम चांगली कामं करीत आले आहेत. त्यांच्या या कार्याला माझा नेहमी पाठिंबा असतो आणि मी कायम त्यांच्या पाठीशी उभा राहीन. – प्रभुदास भोईर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना
याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, माजी नगरसेवक रवींद्र भगत, ताहीर पटेल, विजय खानावकर, नुरभाई खान, सुभाष गायकवाड, जमील शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
Be First to Comment