Press "Enter" to skip to content

हिंडेनबर्ग_अदानी_गांधी_सावरकर

हिंडेनबर्ग रिपोर्ट वर सिटी बेल चे विस्तृत विश्लेषण

पंतप्रधानांना चोर म्हटल्याची शिक्षा म्हणून राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द झाले आहे. सदर प्रकरणात काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यापासून ते रस्त्यावर उतरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी लढण्याच्या मानसिकतेत दिसून येत आहे. या साऱ्याच्या पाठीमागे मूळ कारण दडले आहे ते हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने दिलेल्या अदानी समूहा बद्दलच्या रिपोर्टमध्ये.

हिंडेनबर्ग रिसर्च, त्यांचा रिपोर्ट आणि अदानी समूहाची वाटचाल या साऱ्याचा एकत्रित परामर्श घेत सिटी बेलने एक विस्तृत रिपोर्ट आपल्यासाठी प्रसिद्ध केला आहे…..

हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली.तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतातील लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन मनी लोड्रिंग केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या ‘खास’ अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती.

याबद्दल तीन मतप्रवाह आहेत.काही जण म्हणत आहेत की अदानी कधीतरी अडचणीत येणारच होते, त्यानी प्रचंड कर्जे घेतली आहेत, मुख्यतः एल आय सी आणि एस बी आय कडुन(कारण त्या सरकारी तिजोर्‍या आहेत, त्यामुळे सरकारच्या दबावाखाली पैसे गुंतवावे लागले). हिंडेन्बर्गचे केवळ निमित्त झाले.
दुसरे मत असे की हिंडेनबर्ग ही याच कामासाठी प्रसिद्ध आहे, भरपूर माहिती गोळा करायची,मग त्या शेअर्स वर पैसे लावायचे, आणि मग असे अहवाल प्रसिद्ध करुन तो शेअर शॉर्ट करुन त्यतुन प्रचंड नफा कमवायचा.
काही जणांचे मत आहे की अदानीची परिस्थिती काही ईतकी वाईट नाही (डेत्/इक्विटी रेशो ०.८८ आहे, अर्निंग पर शेअर १० च्या आसपास).


अडिच वर्षपुर्वी अदानींचा उल्लेख “मोदींचा रॉकफेलर’ असा झाला होता. पंतप्रधान झाल्यावर मोदीना अहमदाबादहून दिल्लिला नेण्यासाठी खास विमान होते, ते अदानींचेच होते. अनेक देशांत असलेली शेल खाती, त्यातुन होणारे व्यवहार, ह्याची कल्पना पंतप्रधान,ई.डी.,अर्थखाते.. कोणालाच नव्हती असे मानणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे. अर्थात अदानींची फक्त मोदींशी जवळीक आहे असे नाही. काही महिन्यापुर्वी, रोहित(पार्थ) पवार गौतम अदानीना आणण्यासाठी विमानतळावर स्वतः गाडी चालवत गेले होते. १/२ काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांच्या मुला/मुलींच्या विवाह प्रसंगी गौतम अदानींनी हजेरीही लावली होती. मध्यंतरी शरद पवार ह्यांनी अहमदाबादमधील एका फार्म हाउसवर अदानी ह्यांची गुप्त भेट घेतली होती.”शाहु फुले आंबेडकरांचे नाव घेउन पत्रकारिता करणार्या आपल्या मराठी पत्रकारांनी पवारांना ह्याबद्दल कधी विचारले की नाही ? हे कळायला मार्ग नाही.अदानी ग्रूपचा एकंदरित प्रभाव पाहता “व्यापक राष्ट्रहित लक्षात घेउन आम्ही मोदींच्या पाठीशी आहोत” असे विधान सर्व पक्षांच्या नेत्यानी केले तर आश्चर्य नाही.


गौतम अदानी यांनी ज्या गरीबीतून हे सगळं उभं केलं त्याला तोड नाही. वय वर्ष वीस, वडीलांनी दिलेले शंभर रुपये आणि नातेवाईकांच्या पत्त्यावर मुंबैला पोहचलेले अदानी हीरे बाजारातून ब्रोकर झाले. गुजराती गोड बोलतात. आपण त्यांच्यावर भाळतो आणि मग आपण आता खपलो ही स्थिती यायला बराच वर्षाचा कालावधी लागतो. ”गुजरात दंगलीनंतर गुजरात राज्यात काय,देशातही नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनुकूल वातावरण नव्हतं. अशावेळी मोदींनी उद्योगधंद्यांना राज्यात आकर्षित करण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन 2002 मध्ये केलं तेव्हा फिक्की या उद्योजकांच्या संघटनेनंही त्याकडे पाठ फिरवण्याचाच निर्णय घेतला होता. एक प्रकारे मोदी राजवटीला निषेध करण्याचा तो प्रकार होता. शिवाय नुकतीच दंगल उसळलेल्या भागात गुंतवणूक करणं किफायतशीर कसं ठरेल हा विचारही उद्योजकांच्या मनात असावा.

पण, अशा प्रतिकूल परिस्थितीत गौतम अदानी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी उद्योजकांच्या गटाला गुजरातमध्येच गुंतवणूक करण्यासाठी पटवलं. इथंही त्यांच्या वाटाघाटींचं वकुब कामी आलं. आणि अदानी उद्योग समुहाच्या वतीने स्वत:ही राज्यात भरीव गुंतवणूक केली.

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाच मुंद्रा बंदर चालवण्याचं कंत्राट त्यांना मिळालं. आणि उर्जा क्षेत्रातही त्यांचा जम बसला. एक प्रकारे नरेंद्र मोदींच्या औद्योगिक रणनितीवर अडाणी यांनी दाखवलेल्या विश्वासाचीच ही परतफेड होती. पुढे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून नवी दिल्लीत गेल्यावर हे संबंध आणखी दृढ झाले हे वेगळं सांगायला नको. 2014 नंतर म्हणजे मोदी सत्तेत आल्यानंतर अडाणी यांची संपत्ती अक्षरश: साडेआठ पटींनी वाढली.

2008 मध्ये त्यांचं औद्योगिक साम्राज्य 8 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं होतं, ते 2021 मध्ये 78 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचलंय. केवळ दहा वर्षांत आणि त्यातही शेवटच्या सहा वर्षांत गौतम अदानी यांनी मारलेली ही मोठी मजल म्हणूनच टीकेचं लक्ष्य ठरते आहे.

सरकारशी असलेल्या जवळीकीचा उद्योगधंद्यांमध्ये वापर

2018 मध्ये केंद्रसरकारने 6 आंतरराष्ट्रीय विमानतळांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी निविदा सुद्धा काढल्या. पण, त्या काढताना पूर्वी असलेली अशा कामांचा पूर्वानुभव असण्याची अट यावेळी काढून टाकण्यात आली.जेव्हा कंत्राटाची घोषणा झाली तेव्हा अशा कामाचा कुठलाही अनुभव नसलेल्या अदानी उद्योग समुहाला त्रिवेंद्रम विमानतळाच्या देखभालीचं कंत्राट मिळालं. जी वर दिलेली अट शिथिल करण्यात आली होती, ती अदानींना फायदा मिळावा यासाठीच शिथिल झाली असा आरोप मीडियामध्ये झाला. त्रिवेंद्रममध्ये यावरून डाव्या पक्षांनी मोर्चेही काढले होते. फक्त त्रिवेंद्रमच नाही तर इतर पाच विमानतळांची कंत्राटही अदानी यांनाच मिळाली”. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील याच यादीत समाविष्ट आहे.

मुळात हिंडेनबर्ग च्या रिपोर्टमधे नवीन काही नाही. जी जोखीम लोकांना माहित होती ती आकड्यात मांडली. शेअर बाजारात गुंतवणुक करणाऱ्यांना अदाणी मधे गुंतवणुक करणे जोखीमीचे आहे हे माहित होते.लोक गुंतवणुक करत होते, काहींना जोखीम आवडते पण कधी फसते सुद्धा. अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्यात लोक जोखीम म्हणून पैसे गुंतवतात .व्यवसाय म्हणून विचार केला तर अदाणी पोर्टचा व्यवसाय आजही चांगला आहे पुढेही कदाचित राहिल.परंतु बरोबर एफ पी ओ च्या जरासा अगोदरच हिंडेनबर्गचा अहवाल आला यात नक्कीच काळंबेरं आहे यात पण शंका नाही.

बाकी डाव्या लोकांना उद्योजकांबद्दल मत्सर वाटतो हि जगजाहीर गोष्ट आहे. पूर्वी टाटा बिर्ला होते आता अदानी अंबानी आहेत.अदानी समूहाची नेत्रदीपक प्रगती बऱ्याच लोकांच्या डोळ्यात खुपते आहे. यात

१) काही लोकांनी अदानी समूहाचे समभाग वेळेत घेतले नाहीत आणि आता उशीर झाला आहे यामुळे मत्सर वाटतो आहे

२) काही लोकाना केवळ अदानी श्रीमंत होत आहेत म्हणून जळजळ होते आहे.

३) काही लोकाना केवळ अदानी गुजराती आहेत (आणि श्री मोदी गुजराती आहेत) म्हणून मत्सर वाटतो आहे. पण सरदार पटेल आणि महात्मा गांधी हे सुद्धा गुजरातीच होते

४) उद्योजकांचा मत्सर करणे हे तर डाव्या आणि कम्युनिस्ट लोकांचे तत्त्वज्ञानच आहे.
सत्य काय ते बाहेर येईल (कदाचित नाही सुद्धा).
पण तोवर लोकांची आंतरिक विचारसरणी मात्र उघडी पडते आहे हे पाहून करमणूक होते आहे.
हे प्रकरण काही दिवसांतच थंड होईल. संरक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, देशाच्या शत्रूंशी जवळीक, जनतेवर अत्याचार, देशाच्या संरक्षणात ढिलाई, हिंदूंवर अन्याय अशी प्रकरणे जनतेला भावतात व विरोधी पक्षांनी ही प्रकरणे उचलून पेटवत ठेवली तर जनतेचे मत बदलून सरकार बदलते.अदानी प्रकरणात यापैकी काहीही झालेले दिसत नाही. उद्योगपती व सरकारचे साटंलोटं असतं हे जनतेला फार पूर्वीपासून माहिती आहे व त्यामुळे जनतेच्या मतात फरक पडत नाही.तस्मात् हे प्रकरण विद्यमान सरकारचे व पंतप्रधानाचेवितव्य बदलण्याची सुतराम शक्यता नाही.

या मुद्द्यावर विरोधक म्हणून काँग्रेस पक्षाने राजकारण करणे अभिप्रेत होते. त्यांनी तसे केले सुद्धा परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केल्या गेलेल्या प्रत्येक आंदोलनात किंवा अभियानात जे होते ते यावेळी होणार नाही हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर राफेल विमानांच्या डील मध्ये “चौकीदार चोर है” म्हणून रान पेटवणारे राहुल गांधी चौकीदार कसा चोर आहे ? हे शेवटपर्यंत सांगू शकले नाहीत. भाजपने मात्र एक ओळीचे सुद्धा उत्तर न देता सहा विमाने भारतात आणून दाखवली आणि त्यांच्या देखभालीचे काम व्यवस्थित करून दाखविले. राहुल गांधींनी हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट प्रकरणी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी इन्वेस्टीगेशन ची मागणी केली, यावेळी मात्र भारतीय जनता पार्टी आक्रमक होती. केलेल्या आंदोलनाची इतकी तीव्र किंमत मोजावी लागेल याचा अंदाज राहुल गांधी यांना न आल्याने हे प्रकरण भाजपा पेक्षा काँग्रेसलाच जड जाते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

रिपोर्ट थोड्या बारकाईने अभ्यासाला असता तज्ञांना जाणवलेले काही मुद्दे….

१. मुख्य मुद्दा हा आहे कि अदानी ह्यांनी आपल्या समभागांची किंमत कृत्रिम रित्या वाढवावी आहे आणि अदानी ह्यांच्या मोठ्या नेट वर्थ चा हाच प्रमुख पाया आहे.
२. अदानी ह्यांच्या कंपनीचे ऑडिट शाह धांदरिया हि अत्यंत छोटी कंपनी करते ज्याचे फक्त ११ कर्मचारी आहेत आणि फारच कमी ग्राहक. एवढ्या मोठ्या कंपनीचे ऑडिट करण्यास हि छोटी कंपनी कदाचित सक्षम नाही. (अदानी ह्यांची हि मोठी चूक आहे असे मला वाटते. एखाद्या नामवंत ऑडिट कंपनीला ठेवले असते तर कदाचित हि पाळी आली नसती.)
३. तिसरा मुद्दा शेल कंपनीचा आहे. ह्यांत मला मोठे काही रहस्य आहे असे वाटत नाही. अश्या प्रकारचे हातखंडे सर्वच मोठ्या कंपनी करत असतात आणि त्याला कारणे सुद्धा असतात. रिलायन्स, इन्फोसिस, टाटा सर्वच मंडळी काही ना काही प्रमाणात ह्या धंद्यात असतील आणि ह्यातील सर्वच प्रकार शेवटी बेकायदेशीर असेल असेही नाही आणि हे सर्व बारकाईने अभ्यासण्याची माझी लायकी नाही.
४. अदाणींचे बंधू विविध प्रकारच्या भानगडीत गुंतले आहेत हा मुद्दा. हे सत्य असले तरी गौतम अदानी ह्यांच्या कंपनीवर त्याचा नक्की कसा परिणाम होतो हे हिडनबर्ग स्पष्ट करत नाही. हिरे व्यवसाय हा व्यवसायाच मुळी भानगडींचा आहे आणि त्यांत अदानी ह्यांचे बंधू थोडेफार गुंतले होते तर मला तरी त्यांत मोठे आश्चर्य वाटत नाही.

एकूण रिपोर्ट न्याहाळला असता असे वाटते :

१. अदानी कंपन्यांची स्टीवर्डशिप अत्यंत खराब आहे.
२. स्टोक किमंत कृत्रिम रित्या वाढवली असण्याची पूर्ण शक्यता आहे.
३. ऑडिट रिपोर्ट्स हे भिकार दर्जाचे असण्याची १००% शक्यता आहे.
४. हिडेनबर्ग ह्यांनी केलेले आरोप सत्य मानण्याची गरज नाही पण सेबी ने त्यांत लक्ष घालून सत्य लोकांपुढे आणण्याची गरज आहे.

हिंडेनबर्ग कसे कमावते
हिंडनबर्ग ही शॉर्ट सेलिंग (short selling) कंपनी आहे. ही एक गुंतवणूक कंपनी देखील आहे. कंपनी प्रोफाइलनुसार, ही रिसर्च फर्म एक सक्रिय शॉर्ट सेलर आहे. आता शॉर्ट सेलर समजून घेण्यासाठी प्रथम शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ते समजून घेऊ. कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की ही एक अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलर कंपनी आहे. कमी किमतीत शेअर विकत घेणे आणि तो वाढल्यावर चढ्या भावाने विकणे हा शेअर बाजारात कमाईचा हिट फॉर्म्युला मानला जातो. जेव्हा बाजार वाढण्याची शक्यता असते तेव्हा गुंतवणूकदार ही पद्धत अवलंबतात.

याउलट जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये मंदी किंवा घसरण होण्याची शक्यता असते तेव्हा शॉर्ट पोझिशनची पद्धत अवलंबली जाते. म्हणजेच येत्या काळात या कंपनीचे शेअर्स घसरतील आणि त्याचा फायदा होईल असे जेव्हा गुंतवणूकदाराला वाटते तेव्हा तो शॉर्ट सेलिंगची पद्धत अवलंबतो. म्हणजे आधी तो शेअर्स विकतो आणि शेअर्स घसरला की खरेदी करतो. इथे खरेदी – विक्री व्यवहार पूर्ण होतो. विक्री आणि खरेदीतील फरकातून त्याला फायदा होतो. आता शॉर्ट सेलिंग करणारे वारंवार गुंतवणूकदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात की कंपनीचे मूल्य जास्त आहे किंवा कंपनीवर कर्ज आहे. शॉर्ट सेलर ज्या कंपनीवर लक्ष केंद्रित करतात त्या कंपनीतील कर्ज आणि जास्त किंमत किंवा गैरव्यवहारांबद्दल वारंवार चिंता व्यक्त करतात. अनेक वेळा त्या कंपनीचे शेअर्स बुडतात आणि या शॉर्ट सेलिंग कंपन्यांना त्यातून नफा मिळतो.

अहवालातून मोठी कमाई
हिंडेनबर्ग देखील त्याच प्रकारे कमाई करते. हिंडेनबर्गने अमेरिकेतील अदानी कंपनीच्या बाँड्समध्ये शॉर्ट पोझिशन घेतली असून त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. अदानी शेअर्समध्ये शॉर्ट पोझिशन घेतल्यानंतर हिंडेनबर्गचा हा अहवाल समोर आला आहे. त्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले.

यापूर्वीही या कंपन्या डबघाईला
अदानी ही पहिली कंपनी नाही जिच्याबाबत हिंडेनबर्गने अहवाल दिला आहे. याआधीही त्यांनी अनेक बड्या कंपन्यांविरोधात असे अहवाल दिले आहेत. ही कंपनी कोणत्याही कंपनीला लक्ष्य करते आणि त्यातील त्रुटी दाखवते. या अहवालामुळे जेव्हा कंपनीचे शेअर्स घसरतात तेव्हा ती खरेदी करून हा नफा कमावते. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानीचे शेअर्स 25 टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी समूहाच्या नकारात्मक अहवालापूर्वीही हिंडेनबर्गने अनेक कंपन्यांविरुद्ध अहवाल जारी केले आहेत. 2020 मध्ये सुमारे 16 अहवाल प्रसिद्ध करण्यात आले. या अहवालांमुळे कंपन्यांचे शेअर्स सरासरी 15 टक्क्यांनी घसरले. Hindenburg ने Nikola, SCWORX, Genius Brand, Ideanomic, Vince Finance, Genius Brands, SC Wrox, HF Food, Bloom Energy, Aphria, Twitter Inc या कंपन्यांविरुद्ध अहवाल दाखल केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.