संगीत नृत्याविष्कार रजनी चा अनोखा उपक्रम
सिटी बेल ∆ उरण ∆
आवरे गाव हे जणू काही सांस्कृतिक कलेचे माहेर घर होय आपला घरचा कलाकार हा प्रत्येक क्षेत्रात हा सतत अग्रेसर असावा त्याने आपल्या आविष्काराची चमक ही वेगवेगळ्या स्तरावर दाखवावी यासाठी आवरे गावची माती एक अनोखी आहे एक प्रत्येक कलाविष्काराची माती होय नृत्यप्रकारात आवरे गावाचे नाव अगदी सातासमुद्रापार नेणारे विख्यात नृत्यदिग्दर्शक सचिन पाटील यांच्या संकल्पने वर आधारीत सन्मान लोकलेचा ही नृत्याविष्कार रजनी आवरे गावात मोठया उत्साह पूर्ण वातावरणात पार पडली.
सचिन सर यांच एक उद्दिष्ट्य आहे माझ्या घरचे कलाकार हे रुपेरी पडद्यावर जायला पाहिजे या साठी सर्व ही खटाटोप होय अतिशय बहारदार नृत्यप्रकाराची ओळख , नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळाला यात प्रामुख्याने महाराष्ट्राची लोकधारा जी अगदी इंग्लंड मध्ये निनादली ती लावणी कोळीनृत्य पारंपरिक नृत्ये तसेच विविध भाषी नृत्य तसेच विठुमऊली चा गजर असे सादरीकरण केले.

सदर स्पर्धेचे उदघाटन हे आवरे गावच्या प्रथम नागरिक निराबाई पाटील यांच्या शुभहस्ते झाले सदर प्रसंगी राजा अत्रे सर ,रत्नाकर म्हात्रे अशोक ठाकूर सर , नवनिर्वाचित तंटा मुक्ती अध्यक्ष राजेन्द्र पाटील संदीप गावंड , अविनाश गावंड , संतोष पाटील सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावंड सर हे मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन हे मयूए गावंड यांनी केले तर कार्यक्रमाचे निवेदन विख्यात अभिनेते चेतन म्हात्रे यांनी केले कार्यक्रमासाठी लागणारे सर्व सन्मान चिन्ह हे आवरे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील व शिवसेना युवा नेतृत्व अमित म्हात्रे यांनी दिले तर प्रत्येक नृत्यास प्रोत्साहन संतोष पाटील व आवरे ग्रामस्थ जनतेने दिले तर साऊंड ची व्यवस्था ही श्री अशोक ठाकूर सर यांनी केली.

Be First to Comment