Press "Enter" to skip to content

५७ वर्षांनी भेटल्या मैत्रीणी

के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या ११ वी च्या विद्यार्थिनींचे स्नेह मिलन संपन्न

सिटी बेल ∆ पनवेल ∆

के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या ११ वी च्या विद्यार्थिनींचे स्नेह मिलन जैन हॉल पनवेल येथे नुकतेच संपन्न झाले. यावेळी सत्तरी पार केलेल्या सुमारे ४० जणींनी सहभाग घेतला.

यावेळी अमेरिकेत स्थायीक असलेल्या उज्ज्वला शेठ तसेच बैंगलोर, नाशिक, पुणे , ठाणे , डोंबिवली आदि विविध शहरांतून आलेल्यांनी ७०/७५ नव्हे तर १७ वर्ष वयाच्या उत्साहाने सहभाग घेतला.

सर्वांनी शाळेला भेट देऊन जून्या आठवणींना उजाळा दिला. सर्व शिक्षक वृंदाने या माजी विद्यार्थीनींचे यथोचित स्वागत केले. याप्रसंगी शकुंतला बांठीया , सुमन नातू, शकुंतला दिवटे, कुन्दा कुळकर्णी , सुलोचना घांग्रेकर, उज्ज्वला शेठ , पाटकर मैडम , अंजली भगत , प्रेमा सोहोनी , निर्मला मुनोथ, शैला गड़करी आणि अनेक जणिंनी आपले मनोगत व्यक्त केले .

बालकलाकार वृद्धी बांठीया हिने गाणी सादर करुन सर्वांची मने जिंकली . सर्वांना एकत्र आणुन हा कार्यक्रम सफल आणि अविस्मरणीय करण्यासाठी शकुंतला बांठीया ने ( मेहता, बंगलोर ) अथक मेहनत घेतली . शालेय मैत्रीला वयाचे बंधन नसते याचे मूर्तिमंत उदाहरण असा हा स्नेह मिलनाचा सोहळा ठरला.
सकाळी ९ वाजता सुरू झालेला कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता संपला. जड़ अंत:कर्णाने सर्व मैत्रिणींनी एकमेकांचा निरोप घेतला व आपण पुन्हा भेटू असा निर्धार व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.