कोकणातील शिक्षणाचा दर्जा देशात अव्वल राहणार : कोकण शिक्षक मतदार संघ आमदार बाळाराम पाटील
सिटी बेल ∆ ओरोस – सिंधुदुर्ग ∆
कोकणातील शिक्षणाचा दर्जा हा देशात अव्वल राहाणार आहे. कोकणातील शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच हे शक्य होताना दिसून येत असल्याचा विश्वास कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटना आयोजित कोकण रत्न पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.
महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटना आयोजित कोकण रत्न पुरस्कार सोहळा रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी ओरोस येथील शरद कृषी भवनात झाला. त्यावेळी त्यावेळी आमदार पाटील यांनी शिक्षकांचा सन्मानचिन्ह, शाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला. कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालक मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक यांचा गौरव करण्यात आला. आमदार पाटील पूढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केले. त्यांचे ऋण त्यांनी अखेरीस व्यक्त करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी जे प्रेम केले त्याबद्दल त्यांनी सिंधुदुर्गवासियांचे देखील आभार मानले. या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास सावंत, शिव- सेना नेते संदेश पारकर, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, मराठा महासंघाचे अध्यक्ष ऍड. सुहास सावंत, काका मांजरेकर, दिनेश म्हाडगुत यांच्यासह विविध मान्यवर संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment