Press "Enter" to skip to content

वाणव्यांमुळे खालापूर तालुक्यात वनसंपदेवर संक्रात

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆

भात शेतीची कामे पूर्ण झाल्यावर वणवा लावण्याची नागरिकांची विचित्र पद्धत असते.कोणी व्यक्ती शेतातील कचरा जाळण्यासाठी वणवा लावतात करतात.तर कोणी असेच वणवा लावून देत असताना.या वणवामुळे पर्यावरणाचा -हास होत,त्याच बरोबर वनसंपत्ती नष्ठ होत आहे.

पावसाळा संपला की जमिनीवरील पाणी निघून जाते.त्यामुळे तिथे असलेले ओले गवत सुके होते.हे सुके गवत शेतक-यांच्या गुरांसाठी अत्यंत महत्वाचे असते.परंतू वणवा लावल्याने तिथे असलेले गवत पूर्णपणे जळून जाते.त्यामुळे शेतक-यांच्या गुरांसाठी जंगलातील चारा मिळणे कठीण जाते.हा वणवा लागल्याने तिथे असलेल्या जंगली प्राणी ,पक्षी त्यांची घरटे ,रानातील आयुर्वेदिक वनस्पती या वणवा मुळे जळून खाक होत असल्यांचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे

वणवा लागला जात असलेल्या जीवष्टीचा -हास होत चालला आहे. साधारण फार वर्षापूर्वी मानवी कल्पना होती की पावसाला संपला की सुके गवत पेटून देणे म्हणजे पुढच्या वर्षी चांगले गवत येईल,परंतू शिक्षणाच्या अभावामुळे ठीक आहे.परंतू आता शिक्षणाने माणूस पुढे गेला आहे.त्याला पूर्णपणे या पर्यावरणाची कल्पना आली आहे.तरी सुद्धा काही व्यक्ती जाणूनबुजून हा वणवा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.या वणव्या मुळे वातावरण असह्य होऊन जात आहे तसेच निसर्गाच्या सजीव सृष्टीवर मोठा परिणाम होत आहे.

हा वणवा लावण्याविरोधात वनविभागाची शासकीय यंत्रणा ते गावपातळीवर जनजागृती करणे आवश्यक आहे.तसेच काही लोकांना या पर्यावरणाचे महत्व पटून देणे गरजेचे आहे.वणवा लावून देणा-या व्यक्तीस शाषण व्हावे आणि पर्यावरणाचा -हास केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तिथे जमलेल्या शेतक-यांनी व्यक्त केली .वणवा लावण्यावर जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत असे वणवा लावण्याची विचित्र पद्धत चालूच राहील.आणि पर्यावरणाचा -हास होताच राहील.

वणवा लावून देणा-या व्यक्तींवर जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे असे तिथे जमलेल्या शेतक-यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजे तरच पर्यावरणाचा -हास थांबेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.