साजगाव यात्रेची समाप्ती, स्वच्छतेचे तीनतेरा
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
जत्रा संपली आणी व्यापारी वर्गांनी कचरा येथेच टाकुन परतीच्या प्रवासाला निघुन गेले.जत्रांत वाट्टेल तसा कचरा टाकून स्वच्छतेचे तीनतेरा वाजवत असताना,साजगावच्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेत.
जिल्हातील नागरिक यात्रेला आले, तर काही व्यापार करण्यासाठी येत असतात.मात्र मागे ठेवून गेले निव्वळ कचरा.विठोबा मंदिराच्या भव्य पटांगणावर पंधरा दिवस यात्रा असल्याने संपूर्ण मैदान कचर्याने भरून गेले आहे.आणि डास नि माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरल्यांचे जाणवू लागले आहे.
धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या साजगाव विठ्ठल मंदिराच्या भव्य मैदानावर कार्तिकी एकादशी निमित्ताने सलग पंधरा दिवस यात्रा भरली होती. संपूर्ण राज्यातून भाविक आणि ग्राहकांनी विठूरायाच्या दर्शनासाठी आणि खरेदीसाठी गर्दी केली होती.यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सुकी मासळी बाजार आणि खाऊचे मार्केट. यासोबतच मनोरंजनासाठी आकाश पाळणे, लोकनाट्य, अशा विविध कार्यक्रमांचे आकर्षण ही यात्रा असल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी येथे करोडो रुपयांची उलाढाल झाली.
राज्यातील सुप्रसिद्ध अशा बोंबल्या विठोबा साजगावची यात्रा अखेर सोमवारी संपली. सुक्या मासळीसह खाऊचे पदार्थ आणि मनोरंजनाच्या खेळातून करोडो रुपयांची उलाढाल या यात्रेच्या माध्यमातून झाली आहे. नागरिक यात्रेला आले, विठूरायाचे दर्शनही भक्तांनी घेतले, मात्र मागे ठेवून गेले निव्वळ कचरा.








Be First to Comment