उरणची भू संपादन समस्या सोडविण्यासाठी आ.बाळाराम पाटील यांना शेतकऱ्यांनी दिले निवेदन
सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
उरण तालुक्यातील नागाव, केगाव,चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व जमिनी सिडकोने ताब्यात घेण्यासाठी नोटिफिकेशन वर्तमान पत्रात प्रसिद्ध केल्यानंतर नागाव, केगाव,चाणजे या तिन्ही ग्रामपंचायत शेतकऱ्यांनी निषेध करुन आपल्या जमीनी न देण्याचा निर्धार केला. शासनाचा लक्ष वेधून घेण्यासाठी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून आवाज उठविण्यासाठी आमदार बाळाराम पाटील यांना निवेदन देऊन सदर समस्या सोडविण्याची मागणी केली.
यावेळी तिन्ही ग्रामपंचायतीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. गजानन म्हात्रे, भालचंद्र (भाई) म्हात्रे, मधुसूदन म्हात्रे,काॅ. म्हात्रे, लक्ष्मीकांत पाटील, सुनील पाटील,एडव्होकेट प्रदीप पाटील,शरद कडू, काका पाटील, माया पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment