सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
पेण शहरातील साई मंदिर हे साई भक्तांचे श्रध्दा स्थान असल्याने येथे दर गुरुवारी भक्तांची मांदियाळी पाहवयास मिळते.साई भक्त असणारे गणेश गायकर यांनी मागच्या वर्षांपासून येथे महाप्रसाद (अन्नदान) देण्याचे सुरू केल्याने त्यांच्या या दानशूर पणाला आज वाढदिवसानिमित्त एक वर्ष पूर्ण झाला असल्याने त्यांनी आज सहकुटुंब साई मंदिरात साई आरती करीत माझ्या हातून असाच भक्तांना तिर्थ प्रसादचा लाभ होत राहवा असे सांगण्यात आले.
साई सेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातू येथे अनेक उपक्रम राबविले जातात साई मंदिराची देखरेख करून दर गुरुवारी आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व साई सेवकांनी केक कापून साई सेवक गणेश गायकर यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी अध्यक्ष गणेश जांभळे, गिरीश खामकर, महेश म्हात्रे, अविनाश जोशी, दिपक समेळ, पंकज घोसाळकर, विलास पाटील, अप्पा पवार आदींसह मोठ्या संख्येने साई, भक्त सेवक उपस्थित होते.








Be First to Comment