मुंबई – गोवा महामार्गावरील भूसंपादनात शेतकऱ्यांची फसवणूक
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन केलेल्या जमिनींना २००९ साली एक भाव आणि २०११ ला शेतकऱ्यांना तिप्पट भाव दिला असल्याने यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याने शेतकऱ्यांना त्याच पटीने भाव दिला जावा याकरीता भाजपचे किसान विकास मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष जनार्दन नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रांत कार्यालय येथे दि. ४ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषणाला बसले आहेत.
पळस्पे ते इंदापूर या चार ते सहा पदरी रस्ता रुंदीकरणासाठी नॅशनल हायवे ने उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे भूसंपादन काम सोपवले होते त्यावेळी शेतकऱ्यांची जमीन अत्यंत कमी बाबत घेऊन अन्याय करण्यात आला आहे. सन २०११ मध्ये नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग रायगड अलिबाग यांच्याकडे जमिनीला जास्त भाव देऊन शेतकऱ्यांना त्या रकमेचा मोबदला तिप्पट स्वरूपात दिला गेला आहे.त्यामुळे या अगोदर भूसंपादन केलेल्या जमिनीत व त्यानंतरच्या काही शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली आहे.
नॅशनल हायवेने अतिरिक्त भूसंपादन केलेले असताना देखील शेतकऱ्यांना अतिरिक्त भूसंपादनाचा मोबदला दिलाच नाही.तसेच सन २०११ ते आज पर्यंत शेतीची हद्द कायम केलेली नाही यासंदर्भात जनार्दन नाईक यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार केले त्यानुसार ६ जानेवारी २०१५ रोजी संबंधित कार्यालयाकडून हद्द कायम करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आलेले असताना देखील आजतागायत जमीनीची हद्द कायम करण्यात आलेले नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन आमच्या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करावा अन्यथा हे आमरण उपोषण असेच सुरू राहणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.








Be First to Comment