सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆
ज्येष्ठ पत्रकार नाना मोने यांचे सुपुत्र संदीप मोने हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून एस. टी. महामंडळातुन सेवानिवृत्त झाले आहेत. ते पेण येथील एस. टी. विभागीय कार्यालयात लेखनिक पदावर कार्यरत होते.
संदीप मोने यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष्य स्थान विभागीय लेखाकर विशाखा ढमाले ह्यांनी भूषविले. एक सुंदर कविता सादर करून श्रीमती ढमाले आणि रसिका कांबळे यांनी उपस्थितांची मने जिंकली.मोने यांनी एस. टी. कर्मचारी संघटनेतील अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. एस.टी. कामगार सेनेचे ते रायगड विभागीय सचिव होते. ठाणे, पालघर, मुंबई या विभागातही त्यांनी काम केले. अनेक कामगार चळवळीत संदीप मोने यांचे मोलाचे योगदान आहे.
निरोप समारंभात बोलताना मोने म्हणाले की, आपण यापुढे महामंडळातील कोणत्याही युनियनचे कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे नाही. सध्या कार्यरत असलेली महामंडळातील तरूण पिढी संघटनांचे नेतृत्व करण्यास उत्तमपणे समर्थ असून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारख्या संस्थांकडून नेतृत्व प्रशिक्षण घेतल्यास अधिक उपयोग होईल असेही ते म्हणाले. कामगारांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी रायगड विभागात करिष्मा दांडेकर, वैशाली भोईर, महेश गोळे, गणेश धोंगडे, निखिल देशमुख, समित म्हात्रे यांच्यासह अनेक युवानेतृत्व कर्मचारी असल्यामुळेच आपण कोणत्याही युनियनचे काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपणास राप महामंडळाने भरभरून दिले असून आपण समाधानी असल्याचे संदीप मोने यांनी शेवटी सांगितले.
सदर निरोप समारंभास रिलायन्स समूहाचे राहुल कांबळे, विलास खोपडे, संभाजी मोरे, वैशाली भोईर, करिष्मा दांडेकर, गणेश धोंगडे, महेश गोळे, निखिल देशमुख, लेखाकर रसिका कांबळे, निलम सोनावणे, तन्वी लाड, समित म्हात्रे, आगार व्यवस्थापक पेण आगार श्रीमती अपर्णा वर्तक यांच्यासह विभागीय लेखा शाखेतील सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होता.








Be First to Comment