Press "Enter" to skip to content

अभि युवा ग्रुप देवन्हावेची किल्ले व रांगोळी स्पर्धा संपन्न

स्व.अभी तावडे व स्व.रोहित कडव या मित्रांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे आयोजन

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆

देवन्हावे गावात गेली आठ वर्षापासून सामाजिक बांधीलकी जपणारा अभि युवा ग्रुप हे आपल्या स्व.अभी तावडे या मित्राच्या समरणार्थ विविध सामाजिक कार्यक्रम करीत असतात. त्यातच चार महिन्यांपूर्वी देवन्हावे येथील सर्वांच्या जिवाभावाचा मित्र स्व.रोहित कडव याचे दुःखद निधन झाले त्यामुळे स्व.अभि तावडे व स्व.रोहित कडव यांची स्मृती कायम स्मरणात जिवंत रहावी यासाठी देवन्हावे येथील अभि युवा ग्रुप हे विविध सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम हे करीत.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार वाणी, अतिष पाटील, अक्षय चौधरी, गौरव बारस्कर, सिद्धीक बारस्कर, उज्वल पाटील, अँड.जयेश तावडे, जयेश पालांडे, राज पाटील, यश पाटील, शुभम नलावडे, हर्षल चौधरी, शिवतेज तावडे, श्रेयस चौधरी, सौरभ कडव, रोहित नलावडे, साहिल पाटील, कुणाल पाटील, अवधूत पालांडे, सुजल नलावडे, निशांत चव्हाण,शुभम पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

तर या वर्षी दिवाळी सणानिमित्त महड येथील आदित्य वृध्दाश्रमाला भेट देऊन आजी आजोबा समवेत फराळ देऊन दिवाळी साजरी केलेली आहे. तसेच दिनांक 25 ऑक्टोबर रोजी देवन्हावे येथील आदिवासी वाडीतील नागरिकांना मिठाई देऊन दिवाळी भेट दिली.

तसेच अभि युवा ग्रुप वतीने रांगोळी व किल्ले स्पर्धेचे आयोजन केली पार पडलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक ऐश्वर्या चौधरी, द्वितीय क्रमांक वैशाली पाटील तसेच तृतीय क्रमांक अंकिता पाटील – शीतल तावडे यांनी क्रमांक पटकावला. तर किल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक साहिल पाटील, द्वितीय क्रमांक कृतार्थ तावडे, तृतीय क्रमांक आर्या पालकर यांनी पटकावल्याने या स्पर्धेत एकूण 35 स्पर्धकानी भाग घेतला होता.

तर सर्व विजेत्यांना दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी खालापूर तहसीलचे तलाठी तथा प्रसिद्ध व्यंगचित्रकार, भारतीय सैन्य दलातील सेवा निवृत्त भरत सावंत, सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, उपाध्यक्षा इशिका शेलार, सागरिका जांभळे, नितीनन चौधरी, एकनाथ नलावडे, रामकृष्ण पालकर, गुरुनाथ नलावडे, राजेश आंबवणे, कमलाकर चौधरी, दिनेश नलावडे व अभि युवा ग्रुपचे सर्व सदस्य – गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवतेज तावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.जयेश तावडे यांनी केले.

आपल्या स्वर्गवासी झालेल्या सहकारी मित्रांविषयी स्मरणाची भावना ठेवून सातत्यपूर्ण समाजकार्य करीत असलेल्या अभि ग्रुपचे कार्य हे खरोखरी उल्लेखनीय आहे. ‌ – भरत सावंत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.