सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या पुढाकाराने बालविवाह मुक्त भारत अभियान राबवले जात आहे.या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातही विविध तालुक्यात रॅली काढून बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले असता या अभियानात महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
पेण येथील महाराष्ट्र सामाजिक विकास संस्था पेण, सोहम फाउंडेशन, पनवेल व सोशल एम्पावरमेंट अँड व्हालेंटरी असोसिएशन, मुंबई (SEVA ) यांच्या माध्यमातून १६ ऑक्टोबर पासून हे अभियानाला सुरुवात झाली असून पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा तालुक्यात सुरू झाले आहे.
माणगाव येथील मिरगुंड आदिवासी वाडी, खालापूर येथील खरीवली आदिवासी वाडी, उरण येथील चिरनेर आदिवासी वाडी अलिबाग येथील किहिम आदिवसीवाडी व विविध शाळा कॉलेजमधून कॅन्डल मार्च रॅलीच्या माध्यमातून बाल विवाह बाबत जनजागृती करण्यात येत आहे.
या अभियानात बालविवाह प्रथा करूया नष्ट, पहिले पढाई, फिर बधाई’, ‘चलो अब शुरुवात करे बालविवाह को नष्ट करे’ असे नारे देत प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
यावेळी महाराष्ट्र समाज विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मनोज गावंड, समन्वयक पंकज पाटील व संस्थेचे कर्मचारी वर्ग, सोहम फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजिरी मुळे व त्यांचे सहकारी, अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचत गटांच्या महिला आदि हे अभियान यशस्वी करण्याकरिता मेहनत घेत आहेत.








Be First to Comment