सिटी बेल ∆ उरण ∆ अजय शिवकर ∆
उरण वायू विद्युत केंद्र येथे रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी बॉयलर पंप स्फोट होऊन भयानक अपघात झाला या मध्ये 1.विवेक धुमाले (कायमस्वरूपी कामगार) 2. कुंदन पाटील (डोंगरी, कायमस्वरूपी कामगार) 3.विष्णु पाटील (बोकडविरा कंत्राटी कामगार) या तरुण कामगारांचा दुर्दैवि निधन झाले. या घटनेमुळे त्या कुटुंबियांवर मोठे संकट आले आहे. त्यांना तातडीची मदत म्हणुन GTPS (महाजानको ) व कंत्राटदार श्री सदानंद गायकवाड, श्री राठोड यांनी रु.10,00000 (रुपये दहा लाख) धनादेश मयत कंत्राटी कामगार विष्णु पाटील यांची पत्नी व आई यांचे स्वाधीन श्री गरुड साहेब (HR हेड GTPS)व कंत्राटदार गायकवाड व राठोड यांनी दिले.
तसेच पत्नीला ESIC तहायात पेंशन (सुमारे रु.16,500) विमा व इतर लाभ मिळणार आहेत. तसेच कायमस्वरूपी दोन कामगारांना लवकरच (मृत्यू दाखला आल्यावर ) मंजुरी घेऊन सरकारी नोकरी व आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. विष्णु पाटील यांची पत्नी MSEB कॉलनी मध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहे तिलाही सरकारी नोकरी व सर्व तीन मयत कामगारांचे कुटुंबीयांना रु.50,00000/- नुकसान भरपाई देण्याचे प्रस्ताव MD महाजनको याना पाठविले आहेत. त्याला मंजुरी मिळेल आशी अपेक्षा आहेच. त्याची प्रत आमदार जयंत पाटील व आमदार बाळाराम पाटील यांना दिली आहे.
यावेळी कामगार नेते कॉ.भूषण पाटील विश्वस्त जेएनपीटी, महादेव घरत, बोकडविरा सरपंच सौ.मानसी पाटील,माजी सरपंच भागवान पाटील, अध्यक्ष त्रिशूल ठाकूर, माजी अध्यक्ष सूर्यकांत पाटील, मनोज पाटील.किसान सभा नेते रामचंद्र म्हात्रे,डोंगरी गावाचे किरण घरत ,ग्रामपंचायत समस्या निर्मला पाटील, वंदना पाटील माजी उपसरपंच देवेंद्र पाटील, पराग ठाकूर भूपेश पाटील हे उपस्थित होते.








Be First to Comment