Press "Enter" to skip to content

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्याने वाल्मिकी नगर येथील कलवट बांधकामाला सुरुवात

सिटी बेल ∆ पनवेल ∆

महाराणा प्रताप रोड वरील वाल्मिकी नगरला प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर नाला आहे,नगरपरिषद काळात बांधकाम केलेल्या या नाल्यावरचा स्लॅब हा आता कुचकामी होत चालला होता.या नाल्या वरील स्लॅबची अनेकदा डागडुजी करण्यात आली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही,मजबूत स्लीपर्स टाकूनही फायदा झाला नाही,उर्वरित स्लॅब चा भाग पूर्णपणे धसला आणि त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ लागला होता.

याबाबत नागरिक नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे तक्रार घेऊन आले होते.वाल्मिकी नगरला येण्या जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने विक्रांत पाटील यांनी तात्काळ महापालिकेला पत्र दिलें आणि पूर्णपणे नवीन काँक्रिट कलवट बांधून घेण्याची मागणी केली.विक्रांत पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्याने या कलवट बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.

माझा प्रभाग माझी जवाबदारी या अनुषंगाने काम करणारे विक्रांत पाटील हे नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्रधान्या देत असतात त्याबद्दल प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.