सिटी बेल ∆ रोहा ∆ वार्ताहर ∆
जनरल मजदूर सभा ठाणे धाटाव औद्योगिक कंपन्यांमध्ये गेली अनेक वर्षे काम करत आहेत. सूर्यकांत वढावकर साहेबांनी घालून दिलेल्या आचारसंहितेच्या प्रमाणे काम करत आहेत.धाटाव औद्योगिक कंपन्यांमध्ये सोल्वे कंपनी, दिपक नायट्रेड,कोरस इंडिया,बेंक कंपनी एफ डि सी तसेच सोल्वे कंपनी काॅटक्टर लेबर,युनिकेम कंपनी काॅटक्टर लेबर,बेक कंपनी काॅटक्टर लेबर, एफ् डि सी काॅटक्टर लेबर, सर्व युनियन कमेटी मेंबर्स महिला कर्मचारी उपस्थित होते.
कामगार संघटना, कामगार कायद्यात होणारे बदल, आजची कंपनी उद्योगाची परिस्थिती या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी जनरल मजदूर सभा,ठाणेच़्या अध्यक्षा संज्योत वढावकर मॅडम, जनरल मजदूर सभा, ठाणेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, सेवानिवृत्त कामगार आयुक्त जोशी साहेब, जगदीश उपाध्य, प्रशांत शेटे, अश्विनी राणे,रुपेश जाधव, विकास हारणे उपस्थित होते.
प्रशिक्षण शिबिराला खुप मोलाचं मार्गदर्शन संजय वढावकर, संज्योत वढावकर मॅडम, जोशी साहेब यांनी केले. नविन येत असलेल्या कायदे कामगाराचा कसं तोटा आहे हे समजून सांगितले.कामगार सुरक्षा, महिला कायदे विषयावर संज्योत वढावकर मॅडमने विचार मांडले.
उपस्थिता मंधिल मंगेश कदम, भाऊ मोरे,राकेश बामुगडे, भगवान करंजे,परशुराम महाबले,दिलिप सानप, चंद्रकांत भगत, गणेश पवार सुरेश, बामुगडे यांनी सुधा आपले विचार मांडले.उपस्थिताचेआभार सुहास खरीवले यांनी मांडले.
Be First to Comment