Press "Enter" to skip to content

अमोघ कुळकर्णी यांनी नगरपरिषदेला दिला इशारा

चारफाटा ते भिसेगाव बिकानेर पर्यत रखडलेल्या रस्त्याबाबत ग्रामस्थांचे आंदोलन

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

चारफाटा ते भिसेगाव बिकानेर पर्यत रखडलेल्या कामाबाबत भिसेगाव ग्रामस्थांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी नगरपरिषद प्रशासनास निवेदन दिले आहे, रस्त्याचे अर्धवट काम 15 दिवसात त्वरीत चालू करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरपरिषदेस दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी आणि स्थानिक नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी कर्जत नगर परिषद प्रशासनास दिलेल्या निवेदनात गेले कित्येक वर्षेपासून चारफाटा ते भिसेगाव बिकानेर रस्त्याचे काम रखडल्या प्रकरणी अमोघ कुळकर्णी व त्यांचे सहकारी हे 1 जून 2021 रोजी उपोषणास बसले होते त्या वेळी मा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन प्रो प्रा नरेश अदसानी यांना नगरपरीषद चे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी उपोषण स्थळी वर्क ऑर्डर दिली होती व त्या नुसार 5 जून 2021 रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.

परंतु या वर्कऑर्डर वर 1 वर्षाच्या आत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत असून देखील दिड वर्ष ओलांडून या रस्ताचे काम पूर्ण होत नाही या रस्त्यावरून कर्जत चे बस डेपो मधील बस, रेल्वे स्टेशनला जाणारे पादचारी तसेच इतर पंचाकोशीतील गावातील नागरीक व रहिवासी ये जा करण्याकरिता वापर करत आहे असा हा महत्वाचा रस्ता आहे, पंरतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्याचे काम अर्धवट पडले आहे,सर्वच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, या बेजबाबदार ठेकेदार वर विलंबशुल्क आकारण्यात येण्यात यावा तसेच रस्ताचे काम 15 दिवसाच्या आत चालू करण्याचे आदेश देण्यात यावे व काम सुरू करावे अन्यथा 15 दिवसा नंतर मी अमोघ कुळकर्णी व माझे सहकारी तीव्र आंदोलन या रस्तावर करणार असून याचे सर्वस्व जवाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी ही विनंती असे अमोघ कुळकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे,

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.