कोप्रोली येथील महिलेला सोलर लाईट चे वाटप
सिटी बेल ∆ उरण ∆
मदत काय करतो ? किती करतो ते महत्वाचे नाही. आपण मदत कोणाला करतो आणि त्याला त्याचा खरच त्याला उपयोग होतो का हे पाहणे महत्वाचे. याचे आज छान ज्वलंत उदाहरण सारडे विकास मंचच्या अध्यक्षांकडून पहायला मिळाले.
रोटरी एज्युकेशन सोसायटीचे रोटरी इंग्लिश मीडियम ऑफिसर पुष्पां कृप मॅडम,प्रिन्सिपल अक्षता घरत मॅडम, मुख्याध्यापिका संचिता थळी मॅडम, ओ एस प्रकाश गावंड सर, महेश पाटील यांच्या मार्फत सारडे विकास मंच सामाजिक कार्यास ३००० रु देण्यात आले होते. काही दिवसा आधी प्रथम एज्यूकेशन संस्थेच्या रणिता ठाकूर मॅडम यांनी सारडे विकास मंच च्या निदर्शनास आणून दिले की श्रीमती हिरा ताई म्हात्रे कोप्रोली गावच्या ह्या आज देखील दिव्या च्या उजेडात आपलं जिवन जगत आहेत. त्वरित घराची आणि परिस्थितीतिची पहाणी करत रोटरी एज्युकेशन सोसायटीचे दिलेल्या पैसाचा वापर करत सोलर लाईट देण्याचा विचार करत त्वरीत सोलर लाईट देऊन हिरा ताई ला अंधारातून बाहेर काढण्यासाठी छोटा प्रयत्न केला.
ज्याच्या घरात उजेडच नाही थोडीशी कल्पना करून बघा कस असेल अंधारमय जिवन
आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे सुंदर कार्य पूर्ण करतोय ही कल्पना पुष्पा मॅडम तसेच अक्षता मॅडम तसेच महेश पाटील यांना दिली त्यावेळी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की आम्ही दिलेली ही छोटी मदत एखाद्या महिलेला अंधारातून बाहेर काढण्यास वापरली जाईल खरचं खुप सुंदर कार्य असे बोल सारडे विकास मंच साठी पुष्पा मॅडम,अक्षता मॅडम यांनी व्यक्त केलं आणि जिच्या घरात उजेड करण्यात आला त्या हिरा ताई म्हात्रे यांनी या चेहऱ्या वरील गोड हसू व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
या कार्यासाठी प्रथम एज्युकेशन संस्थे च्या रणिता ठाकुर मॅडम, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे राकेश पाटील, सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे,कार्याध्यक्ष रोहित पाटील,सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड सर, मिलिंद म्हात्रे, हरीश म्हात्रे, त्रिजण पाटील, रामनाथ पाटील, या सर्वांच्या उपस्थित हा सोलर देण्यात आला.








Be First to Comment