पर्यावरण पूरक ई – रिक्षाला सुप्रिम कोर्टाचा हिरवा कंदील
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
माथेरान हे जगभरातील लोकांचे आवडते पर्यटन स्थळ. जगभरातून लाखो पर्यटक माथेरानला भेट देत असतात. पण भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष होऊन सुध्दा येथे बिटींश कायद्याचे पालन तंतोतंत होताना दिसत होते.
ब्रिटीशांनी शोधून काढलेल्या माथेरानमध्ये स्वातंत्र्यच्या पंचाहत्तर वर्षानंतर सुद्धा येथे ब्रिटिश कायदे अस्तित्वात होते. येथे माणसांनी माणसांना ओढणारी रिक्षाची परंपरा स्वातंत्र्यपुर्वकाळापासून चालत आलेली ती आजही कायम आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षानंतर देखील कायम आहे. परंतु ही परंपरा मोडीत काढून बिटींशांच्या गुलामगिरीतून माथेरान मुक्त करण्याचा वीडा येथील सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त शिक्षक सुनील शिंदे यांनी उचलला त्याकरता त्यांना अनेक लोकांच्या विरोधाचा सामना देखील करावा लागला व अनेकांचा रोष पत्करावा लागला. पण त्यांनी त्याची तमा न बाळगता आपला लढा चालू ठेवला. दहा वर्षांपासून त्यांनी ई – रिक्षाचा लढ्यात स्वत:हाला झोकून दिले त्यात त्यांना यश येण्याकरता 2022 साल उजाडले.
प्रदुषण मुक्त माथेरानची खरी ओळख ही पुसली जाऊ नये म्हणून दस्तुरी नाक्याच्यापुढे रूग्णवाहिका तसेच अग्निशमनदलाची गाडी यांनाच परवानगी देण्यात आली आहे. पुढील वाहतुक ही हातगाडी किंवा मनुष्यबळ वापरून केली जाते. तसेच माणसाने माणसाला ओढून नेण्याची हातरिक्षा जी संपूर्ण देशातून हद्दपार झाली असली तरी ती आजही माथेरानमध्ये बिटीश गुलामगिरीची साक्ष देत आहे.
तर येथिल कचरा संकलन करण्यासाठी हातगाडीचा वापर केला जातो. परंतु हातगाडी ओढून होणारी माणसांची दमछाक बघितली तर माणूस आधी की पर्यावरण असा प्रश्न निर्माण होतो. पण मानव मरून पर्यावरण राहिले तर कितपत उपयोग होईल हे कायदे करणाऱ्यांना माहीत असावे.
सध्या हातगाडीवर काम करणारे मजूर अठराविश्व दारिद्र्य असल्याने हे काम करत आहेत. परंतू भावी शिक्षित पिढी हे काम करेल का हा मोठा प्रश्न आहे. जर भविष्यात माथेरानला हातगाडी ओढणारी माणसे मिळाली नाही तर माथेरानचे दळणवळण बंद पडून मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आजपर्यंत अनेक राज्यकर्त्यांनी तसेच शासकीय अधिका-यांनी माथेरानकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केले आणि माथेरानला विकासा पासून कोसो दुर ठेवले.
परंतू बिटींशांनी लादलेल्या गुलामगिरीतून तसेच अमानवीप्रथेतुन माथेरान मुक्त व्हावे व खऱ्या अर्थाने माथेरानला स्वातंत्र्य मिळावे याकरता सुनील शिंदे यांनी लढाई जिंकली असून त्यांना साथ लाभली आहे ती रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची असे म्हणावे लागेल.
ई रिक्षा संदर्भात सहनियंत्रण समितीच्या बैठकीत ( monitoring committee ) काही सदस्यांचा ई – रिक्षाला विरोध असताना ई-रिक्षाचे महत्व पटवून देण्याचे काम कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी प्रभावीरीत्या केले. जिल्हाधिकाऱ्यांनी माथेरानला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मुख्याधिकारी सुरेखा भणगे वेळोवेळी येथील परिस्थितीची जाणीव वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडत होत्या. ई-रिक्षा सुरू करण्याच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम युद्धपातळीवर प्रशासक म्हणून सुरेखा भणगे करीत होत्या.
सुनिल शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळेच ई-रिक्षाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. येथिल अधिक्षक दिक्षांत देशपांडे हे देखील यासंदर्भात आढावा बैठकीला हजर राहून परिस्थिती हाताळत होते तर माथेरान पोलिस ठाण्याचे एपीआय शेखर लव्हे हे ई-रिक्षाला अश्वचालकांचा विरोध असल्यामुळे परिस्तिथीच गांभीर्य ओळखून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चोख पोलिसबंदोबस्त चोख बजावत आहेत.
Be First to Comment