सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
इनरव्हील क्लब कर्जतच्या वतीने कर्जत तालुक्यातील दोन अंगणवाड्यांना मदतीचा हात दिला आहे.

कर्जत तालुक्यातील माळवाडी व किरवली येथील चार अंगणवाड्यांना इनरव्हील क्लब ऑफ कर्जत च्यावतीने फर्निचर व शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले आहे, प्रत्येक अंगणवाडीत 25 ते 30 मुले आहेत. इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी मोनिका बडेकर यांनी 50 हजार रुपये पेक्षा अधिक रकमेचे साहित्य या अंगणवाड्यांना देणगी स्वरूपात दिले आहेत.
याप्रसंगी क्लबच्या अध्यक्ष उत्तरा वैद्य, सेक्रेटरी मोनिका बडेकर, आय एस ओ प्राची चौडीए, मधुरा मुळे, साक्षी अडसूळे आदी सदस्या उपस्थित होत्या.








Be First to Comment