द ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशीप – २०२२ या स्पर्धेत कु.रितिका सु.भोसले, इनाया फ्राज शेख,श्रुष्टी कांबळे यांची उल्लेखनीय कामगिरी
सिटी बेल ∆ मुंबई उपनगर ∆ शांताराम गुडेकर ∆
स्वाभिमान भारत कप, १६ व्या आय.आय.के.एफ(16th I. I. K. F) द ऑल इंडिया कराटे चैंपियनशिप -२०२२ या स्पर्धेत विक्रोळी पार्क साईट येथील डॉक्टर सुहास भोसले यांची कन्या कु.रितिका सु.भोसले हिने उल्लेखनीय कामगिरी करत १८ वर्षावरील गटात काता व कुमिते मध्ये २ सिल्वर पदक जिंकले.तसेच पवार पब्लिक स्कूल भांडुप येथे शिक्षण घेणारी इनाया फ्राज शेख हिने ८ वर्ष या गटात कुमिते मध्ये गोल्ड व काता मध्ये सिल्वर पदक जिंकले.तर श्रुष्टी कांबळे हिने १३ वर्ष वयोगटात काता मध्ये सिल्वर पदक जिंकले.
या स्पर्धेत एकूण ८८६ स्पर्धेक सहभागी झाले होते.महाराष्ट्र, गोवा, पंजाब, तमिलनाडु, बिहार,तेलंगाना, ओड़िशा, वेस्ट बंगाल आदी राज्यमधील स्पर्धेक स्वाभिमान भारत कप, १६ व्या आय.आय.के.एफ(16th I. I. K. F) द ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशीप-२०२२ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
कु.रितिका सु.भोसले, इनाया फ्राज शेख,श्रुष्टि कांबळे यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्ते, मंडळ पदाधिकारी, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी त्यांना अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.
Be First to Comment