सिटी बेल ∆ उरण ∆
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे. मुंबई प्रदेश, कल्याण-डोंबिवली महानगर विभाग यांनी श्रावणोत्सव विषयांतर्गत जागतिक पातळीवरील फेसबुक व्हिडिओ सादरीकरण विविध स्पर्धांचे आयोजन केले. यामध्ये जवळजवळ ६०० स्पर्धकांनी भाग घेतला. यात रायगड- उरण- जासईचे कवी/गायक- अरुण द. म्हात्रे. यांनी श्रावण सरी अनं प्रेम; श्रावण गाणी व आतुरता गणरायाची या तीन विषयांच्या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे निकालांती तिनही स्पर्धांमध्ये त्यांना सुयश लाभले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे वरिष्ठ मंडळ- शरद गोरे, हिरकणी राजश्री बोहरा तसेच सौ. अनिता गुजर, नवनाथ ठाकूर, संयोजक, परीक्षक, आणि संपूर्ण कार्यकारिणी यांनी सुसूत्रितपणे स्पर्धांची आखणी करून स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या. सर्व विजेते आणि सहभागी यांना आंतरराष्ट्रीय सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व स्पर्धकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मनःपूर्वक आभार मानले.








Be First to Comment