सिटी बेल ∆ पनवेल ∆
पनवेल मधील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस आज विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. आज त्यांना विविध राजकीय पक्षांचे नेते, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दुरध्वनी करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उत्तम क्राईम रिपोर्टर आणि वरिष्ठ पत्रकार संजय कदम यांना वाढिदवसाच्या शुभेच्छा देताना मल्हार नेटवर्कचे मुख्य संपादक देवदास मटाले, मल्हार टीव्हीचे संपादक नितीन कोळी, पंकज डावलेकर, श्रीगणेश धुमाळ, अविनाश डोयरिया, विशाल पाटील, योगेश पाटील, चेतन पोपटा, अक्षय शार्दूल, संकेत भोईर, मनीषा हातमोडे उपस्थित होते.










Be First to Comment