Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

सुख म्हणजे नक्की काय असतं ??? पाहूयात… कविश्री- अरुण द. म्हात्रे. यांच्या कवी-मनाने साकारल्या रचनेतून….

सुख म्हणजे काय ?
सुख म्हणजे नक्की काय असतं
शोधत हिंडत फिरायचं नसतं
असते सुख-आनंद अवतीभवती
पदरी पाडून ते घ्यायचं असतं….

हितसंबंध-नाती जपण्यात- सुख
दिला शब्द पाळण्यात- सुख
प्रेम-माया देण्या-घेण्यात- सुख
कुणा उपयोगी पडण्यात- सुख….

सुख- निसर्ग-देखावा पाहण्यात
सुख- संसार-परिवारात रमण्यात
सुख- आईबाबांच्या छत्र-छायेत
सुख- प्राणीमात्रांवरच्या दयेत….

काम-कर्तव्य निभावण्यात- सुख
चांगलं बोलण्या-वागण्यात- सुख
फक्त पैसा-संपत्ती नसते- सुख
आत्मिक समाधानात- खरे सुख….

अनुभवल्यास सुख नसे थोडके
चराचरात आनंद भरलाय खूप
टिपायचे प्रत्येक सुखाचे क्षण
न द्यावे घरंगळुनी, न व्हावी धूप !!

©®कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई मो.-9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.