Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये जलसंजीवनी प्रकल्प

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

युनायटेड वे ऑफ मुंबई संस्थेच्या अंतर्गत जलसंजीवनी हा प्रकल्प कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या मध्ये सुरु करण्यात आला आहे. जलसंजीवनी प्रकल्प अंतर्गत कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत खांडस, अंभेरपाडा, नांदगाव या ग्रामपंचायतीचे निवड करण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायत खांडस व नांदगाव येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती त्या मध्ये जलसंजीवनी प्रकल्पाचे जलसंजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप क्षीरसागर, उपप्रकल्प व्यवस्थापक एम.एस कांबळे, समूह संघटक विवेक कोळी, कृषी तज्ञ जोएब दाऊदी व समूह सहायक संतोष काटे आदी उपस्थित होते.

ग्रामसभेमध्ये प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या सर्व कामांची माहिती देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने मृदा व जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, पाणी ताळेबंद, क्षमता बांधणी व जनजागृती, हवामान अनुकूल शेती व शेतीपूरक व्यवसाय या घटकांची माहिती देण्यात आली.तसेच तुषारसिंचन पद्धतीची शास्त्रीय माहिती देण्यात आली असून गरजू शेतकऱ्यांना संच वाटप करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. प्रामुख्याने खांडस गावातील सरपंच मंगल ऐनकर, उपसरपंच अंकुश ऐनकर, ग्रामसेवक एम.ए.कुटे, अंगणवाडी सेविका आणि गावातील ग्रामस्थ व तसेच नांदगाव ग्रा.प. ग्रामसभे मध्ये सरपंच श्रीमती कारोटे, उपसरपंच , ग्रामसेविका श्रीमती पाटील, प्रगतीशील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.