Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा अशासकीय शांतता समिती सदस्यपदी माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे ह्यांची फेर निवड

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन बैठक सभागृहात ” गणेशोत्सव 2022 ” निमित्त शांतता कमिटीची आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी जिल्हा शांतता समिती च्या पहिल्याच बैठकीत कृष्णाशेठ गंगाराम पारंगे यांनी पाताळगंगा एमआयडीसी व रसायनी विभागातील विविध समस्या मांडल्या.यात जिल्ह्यातील पाताळगंगा ही मोठी एमआयडीसी असून देखील तेथील रस्ते वारंवार पाठपुरावा करून देखील दुरुस्त करण्यात येत नाहीत, नागरिकांना वीज मीटर नवीन जोडणी साठी २-३ महिने प्रतीक्षेत राहावे लागते, जुना मुंबई-पुणे हायवे कोनफाटा येथे नागरिकांना रोजच्या ट्रॅफिक समस्येला सामोरे जावे लागत आहेत. अशा अनेक समस्या मांडण्यात आल्या व या समस्या जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक भूमिकेतून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.

यावेळी शांतता कमिटीचे सदस्य प्रशांत नाईक (अलिबाग), सुरेश म्हात्रे (अलिबाग), निलेश घाटवल (मुरुड), अरुण शिवकर (पेण), राजू पिचिका (पेण), रमेश कदम (कर्जत), अमित शहा (खालापूर), अशफाक पानसरे (नागोठणे), शेख अब्दुल सलीम (म्हसळा), चंद्रकांत लाड (महाड), रामदास कळंबे (पोलादपूर), प्रदिप देशमुख (रोहा), अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभाग, राष्ट्रीय मार्ग विभागांचे विभागप्रमुख, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.