Press "Enter" to skip to content

जेष्ठ पत्रकार सतिश पाटील यांना मातृशोक

गं. भा. श्रीमती इंदुमती विष्णू पाटील यांचे निधन

” भावपूर्ण श्रद्धांजली “
जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला!
गं. भा. श्रीमती इंदुमती विष्णू पाटील वय वर्षे : ८५ यांचे दिनांक :१७ जून २०२६ रोजी हास्पिटल मध्ये उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले.

आयुष्याच्या सुरवातीला खूपच खडतर परिस्थितीला सामोरे गेल्या आपल्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकटीने न डगमता पार पाडली. जरी स्वतः अशिक्षित होती मुलांना चांगले शिक्षण देऊन पायावर उभे केले. काही काळ शेती, भाजी, मासळी चा व्यवसाय अगदी प्रामाणिक पणे केला.आजही खूप ग्राहक प्रामाणिक पाटील ताई म्हणून नाव काढतात.नेहमीच सर्वांना मदतनीस व सल्लागार म्हणून गावात ख्याती होती.अनेकदा अडचणीत आर्थिक मदत करीत असत.भाडेकरू देखील आईच्या प्रामाणिक व मनमिळाऊ स्वभावाने अनेक वर्ष भाड्याने राहून गेल्यावर पण चांगले संबंध म्हणून घरच्या सारखे भेटीला येतात. पत्नी,आई, आजी व पणजी पर्यंतचा सुखकर प्रवास त्यांनी अनुभवला. आणि वयाच्या ८५ वर्षी त्याची प्राणज्योत मावळली.या कठीण काळात त्यांच्या सुनांनी आपल्या आईसारखी सेवा केली.

जीवनात आणखी काय पाहिजे जन्म मृत्यू कोणाला चुकला आहे का!
” मरावे परी किर्तीरुपी उरावे ” अशा मातेला समस्त पाटील परिवार, नातेवाईक व नाहूर गावातील मित्रपरिवार यांच्या कडून भावपूर्ण आदरांजली!

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.