Press "Enter" to skip to content

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण


पनवेल, दि.20 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले.

मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी राज्य पोलीस दलामध्ये पर्यावरण संवर्धनास चालना देणे, हरित उपक्रमाची प्रभावी अमंलबजावणी तसेच “ग्रीन पोलीस स्टेशन“ ही संकल्पना राज्यभर राबविण्यात यावी, या उददेशाने नवी मुंबई आयुक्तालयातील पनवेल तालुका पोलीस ठाणे ठाण्याच्या आवारात प्रकारतील झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे, पो.नि.कांबळे, पोउपनि. जितेंद्र म्हात्रे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे वृक्षारोपण करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.