Press "Enter" to skip to content

नारंगी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी देवेंद्र देशमुख याची बिनविरोध निवड

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्त्वात आले आहे. हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प असुन १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाल्याने तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक गावात किंवा ग्रामपंचायतीचा तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येत असून याच अनुषंगाने खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत नारंगीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी देवेंद्र देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने देवेंद्र देशमुखांना पुढील वाटचालीकरीता सर्व स्तरावरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिम सुरु झाल्यापासून तंटामुक्ती गावाना शासन स्तरावर पुरस्कार ही प्रदान करण्यात येत असते. तंटामुक्ती गाव योजना सरकारने अंमलात आणल्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील गाव तसेच ग्रामपंचायतीमध्ये तंटामुक्ती अध्यक्षाची विशिष्ट ठराविक वर्षाकरीता निवड करण्यात येत आहे. खालापूर तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या नारंगी ग्रामपंचायतीची ग्रामसभा ही सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडल्याने या सभेत सर्वानुमते एक ठराव करीत देवेंद्र देशमुख यांची बिनविरोध ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून देवेंद्र देशमुख बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्ष निवडीने संपूर्ण ग्रामपंचायतीतील जनतेच्या वतीने अभिनंदन वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.