Press "Enter" to skip to content

औद्योगिक वसाहतीशी अनेक गावांना जोडणारा एकमेव पुल

खालापूर तालुका पत्रकार संघाकडून पाताळगंगा जुना पुलाचे नुतनीकरण करून वाहतुकीस खुला करण्याची मागणी

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

दांड आपटा राज्य मार्गांवरून पाताळगंगा वसाहतीकडे जाण्यासाठी नदिवर पुल आहे.हा औद्योगिक वसाहतीला तसेच अनेक गावांना जोडणारा एकमेव पुल असल्याने याच पुलावरून अवजड वाहतूकीसह इतर वाहतूकही सुरू असते.

पाताळगंगा नविन पुलाच्या शिगा व्यवस्थित करुन जुन्या पूलाचे नुतनीकरण करून वाहतुकीस खुला करण्यासाठी खालापूर तालुका पत्रकार संघाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता संदिप बडगे यांना निवेदन देवून मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देताच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता संदिप बडगे यांनी पत्रकारांना जुन्या पुलाचे नुतनीकरण करण्यासाठी मी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून लवकरच जुन्या पुलाचे काम पुर्ण करुन वाहतुकीस खुला करुन देण्यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले.

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणारा पाताळगंगा नवीन पुल हा दोन वर्षांपूर्वीच वाहतूकीसाठी खुला झाला आहे.परंतु पुलावरील रस्त्याच्या लोखंडी शिगा बाहेर पडल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे.त्याची दुरुस्ती तातडीने करावी तसेच नवीन पुलाकडे जाण्याच्या मार्गावर वाहनचालकांचे लक्ष वेधण्यासाठी रेडियम पट्टी लावावी आणि जुन्या पुलाचे नुतनीकरण करून वाहतुकीस खुला करावा अशी मागणी खालापूर तालुका पत्रकार संघाने केली आहे.

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे दांड रसायनीहून जाण्यासाठी पाताळगंगा नदीवर हा एकमेव पूल आहे. या पुलावरून दैनंदिन शेकडो अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. परंतू तीन वर्षे होवूनही जुन्या पुलाचे काम “जैसे थेच”राहिल्याने एमआयडीसी प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर दिसून येत आहे.तरी नविन पुलाच्या लोखंडी शिगा व जुन्या पुलाचे नुतनीकरण करुन वाहतुकीसाठी सुरू न केल्यास पत्रकार बांधव आंदोलन करतील असा इशारा पत्रकार राकेश खराडे यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.