Press "Enter" to skip to content

तालुक्यातील ४ वृध्दाश्रमांना भेट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने पनवेल परिसरातील ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना आज गुरुवार (२५ ऑगस्ट) रोजी पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब असा आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला.

तालुक्यातील स्नेह कुंज आधार गृह, नेरे येथील ३० निराधार ज्येष्ठ नागरिक, शुभम सेवालय वृद्धाश्रम येथील २० निराधार ज्येष्ठ नागरिक, वरलेश्वर वृद्धाश्रम, नेरे येथील १२ निराधार ज्येष्ठ नागरिक व साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था नवीन पनवेल येथील १३ निराधार ज्येष्ठ नागरिकांना मायेची उब म्हणजेच ब्लॅंकेट व तसेच ताट, वाटी, गडू अश्या वस्तूंचे वाटप करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले.

यावेळी पनवेल तालुका विकास पत्रकार मंच्याचे अध्यक्ष माधवराव पाटील, सल्लागार संजय सोनावणे, मंदार दोंदे, संजय कदम, अविनाश कोळी, विवेक पाटील, मयूर तांबडे, राजू गाडे, अनिल कुरघोडे, प्रवीण मोहकर, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष स्वराज सोनावणे, अक्षय शार्दूल, सुनील राठोड आदी पत्रकार, संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष माधवराव पाटील यांनी सांगितले कि, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने आज आम्ही पनवेल परिसरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना अश्या वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय हे वाटप खरे तर तुटपुंजे पण या माध्यमातून जेष्ठांशी संवाद साधायला मिळाला हे महत्वाचे.

तर सल्लागार संजय सोनावणे यांनी सांगितले कि, अश्या प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे आहे, प्रत्येकाला या परिक्रमेतून जायचे आहे तरी प्रत्येकाने जेष्ठांचा आदर राखावा, त्यांना वेळ द्यावा त्यांच्याशी संवाद साधावा तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याचा आनंद तुम्हाला मिळेल.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मंदार दोंदे यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.