सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते नागरिकांना भोगावा लागतोय मनस्ताप
सिटी बेल ∆ रसायनी ∆
दांड-मोहोपाडा रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था सर्वत्र पाहावयास मिळत आहे. मात्र या रस्त्याच्या गंभीर समस्या कडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सण येऊन ठेपला आहे गणपती सण येण्याअगोदर रस्त्याची डागडुजी होणे गरजेचे होते परंतु संबंधित सा.बां.खात्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप भोगावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालक व सर्वसामान्य जनतेला मनस्ताप भोगावा लागत आहे.
सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असुन खड्ड्यांमध्ये पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज नआल्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर याच खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा या रस्त्याच्या गंभीर समस्यांकडे लक्ष द्यायला संबंधित प्रशासनाला वेळच नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकप्रतिनिधींचा संबंधित अधिकाऱ्यांवर वचकच नाही
लोकप्रतिनिधी व स्थानिक नेतेमंडळींचा संबंधित अधिकाऱ्यांवर वचक व दबाव नसल्याने सामान्य जनतेला नाहक मनस्ताप भोगावा लागत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून व्यक्त, होत आहे. काही दिवसांवर गणरायांचे आगमन होणार असून गणपती सणापूर्वीच या रस्त्याची चांगल्या पद्धतीने डागडुजी करून रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी रसायनी-मोहोपाडा वासियांन कडून व्यक्त होत आहे. रसायनी-मोहोपाडा परिसरातील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र हे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. या परिसरातील औद्योगीकरणाबरोबर शहरीकरण व नागरीकरण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. नोकरी धंद्याच्या निमित्ताने विविध राज्यातून अनेक नागरिक या परिसरात वास्तव्य करत असून नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाला वेळच नसल्याचा आरोप सामान्य नागरिकां मधून व्यक्त केला जात आहे.
गणपती सणापूर्वी रस्त्याचं सुस्थितीत काम करा नाहीतर आंदोलन करणार : आनंद पवार
दांड-मोहोपाडा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक झाले आहे. वेळोवेळी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात दैनिक महानगरी टाईम्सच्या वृत्तपत्रासह विविध वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध करून देखील ही सां.बा खात्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे होणारे नुकसान व सतत घडणारे अपघात याला कारणीभूत संबंधित प्रशासन आहे. दांड- मोहोपाडा रस्त्यावरचे खड्डे जर गणपती सणापूर्वी बुजवले नाहीत व रस्त्याची सुस्थितीत डागडुजी केली नाही तर वेगळ्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात आंदोलन करणार असा इशारा पत्रकार आनंद पवार यांनी दिला आहे. याबाबतचे संबंधितांना लवकरच निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.








Be First to Comment