श्रावण सरींवर आधारित कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे यांची स्वरचित कविता – “नटखट श्रावण सरी !!”
“नटखट… श्रावण सरी !”
हिरव्या ऋतूच्या…. श्रावण सरी
मन उत्साही…… आनंदी करती
किरणांसंगे……. चाले लपंडाव
अशा सुखद….. सरी झरझरती… 1.
सप्तरंगांची…… सौंदर्य कमान
इंद्रधनु रुपे……. दिसे गगनात
चमकती छान……. सूर्यकिरणे
घालुनी सरींच्या… हातात-हात… 2.
सृष्टी-वनचरी….. सजते-बहरते
प्रेम साऱ्यांचे…. श्रावण सरींवर
प्रित-कळ्या त्या.. उमलू लागती
नूर प्रेमींच्या….. मुख-कमलावर… 3.
तनास तुषार….. हलके स्पर्शती
मनात आगळे…. चैतन्य भरती
श्रावणातील या…. श्रावण सरी
सर्वांनाच … हव्या-हव्या वाटती…४
येणे घाई-घाईत…. जाणे लगेच
नटखटपणा….. श्रावण सरींचा
किरणे कधी…… वायुसंगे दौरा
प्रेम-हट्ट… भिजवून टाकण्याचा…५
©®कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.
नवी मुंबई, मो. 9987992519.
Be First to Comment