Press "Enter" to skip to content

खांदा कॉलनी येथे विनायक मेटे यांना श्रद्धांजली

सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने स्वर्गीय विनायक मेटे यांच्या शोकसभेचे आयोजन

सिटी बेल ∆ खांदा कॉलनी ∆

सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने स्व. विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन जनसेवा आश्रम हॉल, खांदा कॉलनी या ठिकाणी केले होते.

यावेळी स्व. विनायक मेटे यांना जड अंतःकरणाने मराठा समाज बांधवाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सदरच्या शोक सभेत स्व. मेटे यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कार्याचा उजाळा देत श्री किशोर पाटील – अधीक्षक अभियंता नाशिक, पवार साहेब निवृत्त DCP मुंबई , पनवेल महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका, खारघर फोरम च्या अध्यक्ष सौ.लीना अर्जुन गरड, मराठा क्रांती मोर्चा रायगड जिल्हा समनवय्यक माजी नगरसेवक गणेश कडू, मराठा उद्योजक रामदास शेवाळे, सकल मराठा समाज कळंबोली चे समनवय्यक संदीप जाधव, पनवेल महानगरपालिका विद्युत अभियंता बी आर कदम, सुनील औटी, बीड जिल्हा रहिवाशी गोपीनाथ मुंढे, लालासाहेब लोंबटे, उमेश वारदे, बाळासाहेब खोसे , संतोष जाधव आदी मान्यवरांनी शोक व्यक्त केला व अमर रहे !! अमर रहे !! मेटे साहेब अमर रहे च्या घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.

या प्रसंगी सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी , शिवसंग्राम संघटना, बीड जिल्हा रहिवाशी खांदा कॉलनी येथील समाज बांधव उपस्थीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.