Press "Enter" to skip to content

नागोठण्यातील केएमजी विभाग गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी दिनेश घाग यांची फेरनिवड

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆

नागोठण्यातील नावलौकिक गणेशोत्सव मंडळा पैकी केएमजी विभागातील गणेशोत्सव मंडळ संपूर्ण नागोठणे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. याच मंडळाच्या अध्यक्षपदी सन २०१२ रोजी दिनेश घाग यांची या मंडळावर नियुक्ती झाली होती. दिनेश घाग यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने आणि त्यांचे लहान थोरांसोबत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने के एम जी मधील ग्रामस्थांनी त्यांची अध्यक्ष पदावर सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे.

त्यांच्या सोबत उपाध्यक्ष म्हणुन उदय लाड, सचिव रोहिदास हातनोलकर, खजिनदार राकेश चितळकर, सहसचिव रविंद्र वाजे, सहखाजिंदार संतोष नागोठणेकर तर सल्लागारपदी विलास चौलकर, सुनिल लाड, मोहन नागोठणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्ष म्हणुन मनोज गायकवाड, गणेश बिरवाडकर, विकास वादळ यांची नियुक्तीकरण्यात आली. या वेळी केएमजी विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी सर्व ग्रामस्थांनी दिनेश घाग यांचे अभिनंदन केले. यावर्षी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यात येईल असे यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश घाग यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.