सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
खालापूर तालुका युवा वकिल संघटनेचा वार्षिक स्नेह संमेलन व वकिल गुण गौरव सोहळा नुकताच खालापूर पंचायत समिती सभागृहात पार पडला असून या सोहळ्यास खालापूर न्यायालयातील न्यायाधिश आर.डि.वाबळे, सहन्यायाधिश पि.एम. माने, दुसरे सह न्यायाधिश एल.के.सपकाळ, गटविकास अधिकारी बि.एस.पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी एम.जि.शिंदे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तर युवा वकील संघटनेचे सन 2021 ते 2022 या वर्षांचे अध्यक्ष पदाचा कार्यभार अँड.योगेश मानकवळे यांनी योग्य रितीने पार पाडल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव खालापूर न्यायालयाचे न्यायाधिश आर.डी वाबळे व इतर न्यायाधिश यांचे हस्ते करण्यात आले असून वकीली क्षेत्रात 25 वर्षे पुर्ण झाले म्हणून अँड. नितीन तोरणे यांचे न्यायाधिश वर्गाकडुन गुण गौरव करण्यात आले. तसेच सन 2022 ते 2023 या वर्षाकरीता युवा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड.जे.डी.पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे न्यायाधिश यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
तसेच दहावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वकील संघटनेच्या वतीने करण्यात आल्याने. विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले असून याप्रसंगी न्यायाधिश आर.डि.वाबळे यांनी आपले विचार व्यक्त करताना, पॅन इंडीया मोहोस्तव व्यवस्थित पार केला त्याबदद्ल वकिल वर्गाचे कौतुक करित विधी सेवा समितीचे सर्व कार्यक्रम – शिबीर सहकार्य केल्याबदद्ल सर्व वकीलांचे आभार मानले. तसेच न्यायाधिश पि.एम.माने नॅशनल लिगल सव्र्हस अँथोरिटी माध्यमातुन आलेल्या कार्यक्रमास वकिल वर्गाचे यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल सर्वाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.








Be First to Comment