सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत नगर परिषदे मध्ये एक शाम देशभक्ती के नाम क्या देशभक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कर्जत नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये कर्जत नगरपरिषद रोटरी क्लब कर्जत आणि कर्जत कराओके क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते भारत माता पूजन आणि दीप प्रज्वलन करून देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कर्जत रोटरी क्लबचे अध्यक्ष सतिश श्रीखंडे, सेक्रेटरी विशाल शहा, सचिन ओसवाल, अरविंद जैन, दिपचंद जैन, डॉ. प्रेमचंद जैन,जितेंद्र ओसवाल, सुनिल सोनी, डॉ आदित्य जंगम, योगेश राठी,सुशांत ठकेकर, कराओ के क्लब अध्यक्ष संजय वाघमारे आदी उपस्थित होते.
प्रथम तुला वंदितो हे गणेश स्तवन सादर करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.जहा डाल डाल पर सोने…, सत्यम शिवम सुंदरम.., कर चले हम फिदा…, इ देश विर जवनो का…, नन्हा मुन्ना राही हू..,छोडो कल की बाते…, संदेसे आते है…., मेरा मुल्क…, जय जय महाराष्ट्र माझा…, ए मेरे वतन के लोगो…. ने मजशी ने परत मातृभूमीला…, शूर आम्ही सरदार आम्हाला…, दिल दिया है जान भी देंगे…, अशी देशभक्ती पर गीते रविंद्र लाड, गौतम वैद्य, प्रतिमा भालोदकर, रमाकांत जाधव, संजय वाघमारे, नम्रता देवरे, हमीद खैराट, राम देवरे, प्रसाद जोशी यांनी करओ के वर सादर केली.
देशभक्ती पर गीत सादर होत होती त्यामुळे नगरसेवक उमेश गायकवाड, राहुल डाळींबकर तर रोटरी क्लब चे सदस्य सचिन ओसवाल, जितेंद्र ओसवाल यांनी शांत बसवले नाही आणि त्यांनीही देशभक्ती पर गीते गाऊन स्वातंत्र्य साठी बलिदान दिलेल्याना आदरांजली वाहिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र लाड यांनी केले.
याप्रसंगी नगरसेवक बळवंत घुमरे, संकेत भासे, हेमंत ठाणगे, नगरसेविका संचिता पाटील, स्वामिनी मांजरे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी नगरसेवक संतोष पाटील, मुकेश पाटील आदी सह नागरिक , कर्मचारी उपस्थित होते.
Be First to Comment