हर घर तिरंगा अभियान अंतर्गत कर्जत नगरपरिषदेच्या वतीने कर्जत शहरात प्रभात फेरी
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव 15 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे, हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जनजागृती म्हणून कर्जत नगरपरिषदेच्या वतीने कर्जत शहरात प्रभात फेरी आयोजन करण्यात आले होते,देशपर घोषणांनी कर्जत शहर दुमदुमले होते.

12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नगरपरिषद कार्यालयातून कर्जत शहरात प्रभातफेरीत काढण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार विक्रम देशमुख, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी सुरेखा भणगे, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे, नगरसेविका सुवर्णा निलधे, पुष्पा दगडे, मधुरा चंदन,भारती पालकर, डॉ. ज्योती मेंगाळ, विशाखा जिनगरे, नगरसेवक राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे, संकेत भासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र नातू, उपाध्यक्ष अच्युत कोडगिरे, रोटरी क्लब चे अध्यक्ष सतिश श्रीखंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत उगले, दिनेश गणेगा, छाया कुलकर्णी आदी सह नगरपरिषद कर्मचारी, शिक्षक,कर्जतकर मोठ्या संख्येने सामील झाले होते.

कर्जत मधील अभिनव ज्ञान मंदिर, महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर, कर्जत एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडीयम स्कुल, शारदा मंदिर, उर्दू शाळा, शिशु मंदिर शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सदस्य, रोटरी क्लब सदस्य, सामाजिक कार्यकर्ते या प्रभातफेरीत सहभागी झाले होते, कर्जत नगर परिषद कार्यालय येथून सुरू झालेली प्रभातफेरीत अभिनव शाळेचे लेजीम पथक पुढे होते, विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा झेंडा होता, ही प्रभात फेरी भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आली मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर आमराई रस्त्याने सुरभी ज्वेलर्स – कर्जत एज्युकेशन स्कूल पासून — महावीर पेठ — मधून रेल्वे स्टेशन जकात नाका — पुढे मयुरा हॉटेल कोपऱ्या वरून खाटीक आळी — मारुती मंदिर — पाटील आळी मार्गे — छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास जवळ आल्यावर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर कचेरी रोड ने –आनंदनगर वरून पुन्हा नगरपरिषद कार्यालयात समारोप करण्यात आला.








Be First to Comment