Press "Enter" to skip to content

पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव रॅलीचे आयोजन

सिटी बेल ∆ पनवेल ∆

उद्या दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा/बाईक/कार रॅली आयोजित करण्यात आली आहे.

सदर रॅलीची सुरुवात उद्या सकाळी ठीक 9 वाजता पनवेल काँग्रेस पक्ष कार्यालयापासून होणार असून पनवेल शहर – नवीन पनवेल – खांदा कॉलनी – कामोठे – कळंबोली – नावडे – तळोजे मार्गे जाऊन खारघर येथे रॅलीचे समारोप होणार आहे.

या रॅलीत पनवेल शहर जिल्हा व सर्व ब्लॉकचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सामील होणार आहेत. या रॅलीमध्ये राष्ट्रप्रेमी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन मी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहे.

– अभिजित पांडुरंग पाटील
अध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस

१. पनवेल पदयात्रेचा मार्ग :

महात्मा गांधी पुतळा महानगरपालिका मुस्लिम नाका टपाल नाका (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ) भाजी मार्केट कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा लाईन आळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन रोड

२. नविन पनवेल पदयात्रेचा मार्ग :

पोदी – अभ्युदय बँक – ए टाईप साई बाबा मंदिर रोड बी १० पाण्याची टाकी पेट्रोल पंप सिनेराज सिनेमा रोड अरुणोदय हॉस्पिटल बिनेदार कॉर्नर कॉंग्रेस कार्यालय द्वारका स्वीट तुलसी हाईट्स खांदा कॉलनी ब्रिज

३. खांदा कॉलनी पदयात्रेचा मार्ग : ‌ ‌ शिवाजी चौक सेक्टर ९ हावरे वृंदावन ओमकारेश्वर – सागरदिप अभ्युदय बँक आसुडगांव कॉर्नर आगरी शाळा अष्टविनायक हॉस्पिटल महात्मा स्कूल खांदेश्वर पोलीस चौकी – साईशरण कॉर्नरला सांगता होऊन पुढे कामोठे येथे प्रस्थान होईल..

(नाष्ट्याची व्यवस्था खांदा कॉलनी येथील पदयात्रेत केली जाईल )

४. कामोठे पदयात्रेचा मार्ग :

विस्टा कॉर्नर – नीलकंठ मिठाई गोकुल डेरी मनमोहन मिठाई कॉंग्रेस कार्यालय – कामोठे पोलिस ठाणे हायवे समाप्त

५. कंळबोली :

शिवसेना शाखा कंळबोली बस स्थानक ( के एल ५ समोर ) व तळोजाच्या दिशेने प्रस्थान – डी मार्ट अविदा हॉटेल जवळ समाप्त –

६. नावडे – तळोजे पदयात्रेचा मार्ग :

लोकनेते दि.बा. पाटील साहेब चौक फेज-२ नानासाहेब धर्माधिकारी नदीपुल फेज-१ तळोजा शहर पोलीस चौकी मनिषा मार्ट सेक्टर-४ ओम साई स्वीटस् पार्वती हाईट्स सबवे मार्ग – पापडीचापाडा सिन्गल मन्नान कॉलनी भारत राईस मिल तळोजा

७. खारघर पदयात्रेचा मार्ग :

खारघर सेक्टर ३४ / ३५ बागवान हॉटेल ते पोलीस चौकी, सेक्टर ३० ओवे नाका ते खारघर शिल्प चौक वरून खारघरचा राजा गणपती मंदिर ते नवरंग, नवरंग ते पटेल हॅरिटेझ, मॉर्डन स्वीट ते उत्सव चौक येथे सांगता होईल.

(भोजनाची व्यवस्था खारघर येथील पदयात्रेत केली जाईल)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.