Press "Enter" to skip to content

सम्यक सामाजिक संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

माजी सरपंच संदीप सुदाम मुंढे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून सम्यक सामाजिक संस्थेच्यावतीने पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील माजगाव ग्रामीण भागातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेतील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच संदीप मुंढे यांना वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ व काचेची प्रतिमा भेट देवून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.ज्येष्ठ समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड व माजी सरपंच संदीप मुंढे यांच्याहस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच संदीप मुंढे व उमाताई मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा सांगत रसायनी परिसरातील त्यांच्या कार्याचा ज्येष्ठ समाजसेवक व सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी गौरव केला.

यावेळी गायकवाड यांनी सांगितले की शाळेची परिस्थिती पाहता येथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसाठी मदत करावी या शाळेत गोरगरीब व आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणे शिक्षण घेत असल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत करणे गरजेचे आहे असे सांगितले .यावेळी माजी सरपंच संदीप मुंढे यांनी या शाळेला सर्व परीने मदत करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक व सम्यक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अजितदादा कडलक , तायडे सर, गणेश जावळे ,महेंद्र जाधव, सामाजिक संस्थेचे सचिव दीपक इंगळे, बबनदादा पाटील, नरेश पाटील, किशोर पाटील, विनायक गायकवाड , राधेश्याम चौधरी, अविनाश कांबळे , राहुल इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कांबळे यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.