कर्जत मध्ये रात्रीच्या सुमारास घरावर पडले झाड
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत नगरपरिषद हद्दीत येत असलेल्या डेक्कन जिमखाना कचेरी रोडलगत तुषार खवणेकर यांच्या घरावर रात्री अकराच्या सुमारास झाड पडुन घराचे नुकसान झाले असुन दैव बलवत्तर म्हणून कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तुषार खवणेकर हे गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ कचेरी रोड जवळ श्रीराम मेढी चाळीत राहत आहेत. त्यांच्या घरा शेजारी सुमारे शंभर वर्ष जुने असेलेले आंब्याचे झाड मागील तीन चार दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी रात्री मुळापासुन तुटून घरावर पडले. त्यामुळे घराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

खवणेकर कुंटूब रात्री झोपण्याच्या तयारीत असताना अचानक रात्री अकराच्या सुमारास मोठा आवाज होऊन घरातील भिंत अर्धवट खाली आली, ही बाब मुलगी तनु व विधी यांच्या लक्षात येताच त्यांनी घरातील इतर सदस्यांना घरावर झाड पडल्याची कल्पना दिली. सर्व कुंटुंब क्षणात घराबाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला तसेच झाड घराच्या भिंतीच्या आधारावर थांबले.
याबाबत तहसिलदार विक्रम देशमुख यांना कळवले असता त्यांनी तातडीने नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे यांना सांगुन माणसे पाठवली. पण दुसर्या दिवशीही नगपरिषेदच्या आपत्कालीन विभागाला झाड काढण्यास अपयश आले. झाड अजुनही त्याच स्थितित आहे. तर विज वितरण कंपनीचे अभियंता साबळे यांना कळवले असता त्यांनी तात्काळ कर्मचारी पाठवुन चालु असलेली विद्युत लाईन बंद केली.
—- मदतीचे आवाहन —-
तुषार खवणेकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुन्हा घर उभारणे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने समाजातील दानशुर व्यक्तिने आपल्या परीने मदत करुन त्यांना घर बांधण्याकरता मदत करावी. असे आवाहन कुंटूबीयांकडुन करण्यात येत आहे. कृपया 8793760463 या गुगल पे नंबरवर आर्थिक मदत करावी.
———————








Be First to Comment