श्रावण महिना म्हणजे हिंदू सणांचा महत्त्वाचा महिना, सागर मंथनातुन मिळालेल्या अमृत प्राप्तीसाठी झालेल्या देव-दानवातील यूद्धामुळे समुद्रात उथांड होतो त्याला शांत करण्यासाठी देवांनी सागराची पुजा करून सुवर्ण नारळ अर्पुण समुद्र शांत केला म्हणूनच खवळलेला समुद्र नारळी पौर्णिमेनंतर शांत होतो म्हणसावर्डेकर कोळी बांधव समुद्र म्हणजे वरूण देवतेचे प्रतिक त्यास सोन्याचा नारळ अर्पुण आभार मानतात व त्या नंतरच मासेमारी साठी आपल्या होड्या समुद्रात सोडतात म्हणून हा नारळीपोर्णिमा सण.
समुद्रापासुन आपल्याला पाऊस मिळतो आणि पावसापासुन आपल्याला पिण्यास पाणी, विज व इतर कित्येक गोष्टींची पूर्तता होते म्हणून त्याचे कृतघ्नता व्यक्त करण्याचा दिवस नारळीपोर्णिमा, खरतर हा सण सर्वांनी साजरा केला पाहिजे पण करतोय फक्त कोळीबांघवच, म्हणून कोळी हाच खरा दर्याचा राजा.
देव आणि दानवांत जेव्हा अमृत प्राप्तीसाठी युद्ध झाले तेव्हा दानव देवांना भारी पडू लागले ह्या वेळी देवांचा राजा इंद्राच्या पत्नीने आपल्या पतीच्या रक्षणासाठी त्याच्या दंडाला रक्षाधागा बांधला, आणि त्या युद्धात देव विजयी झाले, ह्या नंतर स्त्रीया युद्धात जाणाऱ्या आपल्या पतीला हे रक्षाधागा नित्य बांधु लागल्या, त्यात पुढे अविवाहित भावांना बहिणी भावाच्या रक्षणासाठी हा धागा बांधू लागल्या पुढे हा दंडावरील धागा हातापर्यंत आला व, कालांतराने पुढे बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाचा हा सण बनला .
नारळीपोर्णिमे नंतर दुसऱ्या दिवसी साजरा होणारा सण म्हणजे रक्षाबंधन.
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७५५९१११६४८
७९७७९५०४६४
Be First to Comment