सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ९ ऑगस्ट रोजी येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयात साजरी झाली.
सर्वप्रथम संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुनिता जोशी यांनी प्रास्ताविक केले .संस्थेच्या सहकार्यवाह सौ. जयश्री शेटे व कार्याध्यक्ष विनायक वत्सराज यांनी डॉ .रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
संस्थेचे कार्याध्यक्ष काशिनाथ जाधव यांनी रंगनाथन यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली. ग्रंथालयाचे सदस्य राजकुमार ताकमोगे यांनी आपल्या भाषणात ग्रंथालय चळवळी विषयी व लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या सक्रिय सहभागा विषयी विवेचन केले .
सदर कार्यक्रमास ग्रंथपाल सौ. निकिता शिंदे, कार्यकारिणी सदस्य रमेश चव्हाण , वाचक वर्गापैकी रत्नाकर कुलकर्णी, हसन दमडे ,ऍड धाडस भोपी, वसंत कोंडेकर व इतर नागरिक उपस्थित होते.








Be First to Comment